नांदेड : नरेंद्र मोदी सरकारने काँग्रेसचे माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान प्रदान केल्यानंतर राव यांचे काँग्रेसमधील सहकारी, माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांनाही मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची मागणी कुणबी मराठा महासंघाच्या मेळाव्यात एका ठरावाव्दारे करण्यात आली. गेल्या आठवड्यात नांदेडमध्ये पार पडलेल्या या मेळाव्यास शिवसेनेच्या माजी खासदार आणि आता विधान परिषद सदस्य भावना गवळी उपस्थित होत्या.

हेही वाचा : “सरकार उलथून टाकण्यासाठी एकत्र या”, उद्धव ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
maharashtra assembly election 2024 akot vidhan sabha constituency Prakash Bharsakale
अकोटमध्ये जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर?
mla maulana mufti ismail vs asif sheikh maharashtra assembly election 2024
लक्षवेधी लढत : धार्मिक वलय मौलाना मुफ्ती यांना किती उपयुक्त?
Narendra Modi, Narendra Modi Pune,
पुणे : मोदींच्या सभेसाठी भाजपसह महायुतीसमोर ‘हे’ आव्हान! स. प महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी होणार सभा

अशोक चव्हाण भाजपावासी झाल्याचे निमित्त तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या जाहीर सभेत शंकरराव चव्हाण यांच्या विषयी काढलेल्या गौरवोद्गाराच्या पार्श्वभूमीवर ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने शंकररावांचा मरणोत्तर सन्मान व्हावा, अशी त्यांच्या पुरोगामी मराठा म्हणून ओळखल्या जाणार्‍या अनुयायांची अपेक्षा आहे. या मागणीसाठी आम्ही राज्य सरकारकडेही आग्रह धरणार आहोत, असे वरील मेळाव्याचे संयोजक व राज्य कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव यांनी येथे स्पष्ट केले.