नांदेड : लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्या ‘आदर्श’ प्रकरणाचा उल्लेख केला आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना ‘डीलर’ असे संबोधले, ते अशोक चव्हाण आता भाजपासाठी ‘लीडर’ झाले असून चव्हाण आणि फडणवीस यांनी नांदेडमधील भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडून देण्याचे आवाहन गुरुवारी संयुक्तपणे केले.

नांदेड लोकसभा मतदारसंघात अशोक चव्हाण विरुद्ध भाजपा असा सामना २०१४ व २०१९ साली झाला होता. पहिल्या निवडणुकीत चव्हाण विजयी झाले होते. नंतरच्या निवडणुकीत प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व करणार्या अशोक चव्हाण यांच्यावर पंतप्रधानांनी व्यक्तिगत टीका केली होती तर फडणवीस यांनी चव्हाण यांच्या व्यवसायाचा संदर्भ देत नांदेडच्या राजकीय मैदानावर त्यांना ‘डीलर’ असे संबोधले होते. पण नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण यांची मजबूत पकड लक्षात घेत भाजपाने निवडणुकीच्या तोंडावरच चव्हाण यांना आपल्यात सामावून घेत ‘स्टार प्रचारक’ केले आहे.

Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly election 2024 akot vidhan sabha constituency Prakash Bharsakale
अकोटमध्ये जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर?
maharashtra assembly election 2024 srijaya chavan vs tirupati kadam kondhekar bhokar assembly constituency
लक्षवेधी लढत : मुलीसाठी अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला!
Kalyan Dombivli assembly election campaign wage rates labour
कल्याण-डोंबिवलीत प्रचार टिपेला, मजुरीचे दर शिगेला; प्रचारासाठी लागणाऱ्या मजुरांचे दर २५० ते १२०० रूपये
murbad constituency kisan kathore subhash pawar, agri and kunbi
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची
BJP, sameer meghe, NCP Sharad Pawar ramesh bang
हिंगण्यात मेघेंची हॅटट्रिक बंग रोखणार ?

हेही वाचा : “…तेव्हापासून कॉलर उडवण्याची स्टाईल सुरू झाली”, उदयनराजे भोसलेंनी सांगितला यात्रेतला किस्सा

मागील दोन आठवड्यांपासून चव्हाण आणि त्यांचे समर्थक चिखलीकर आणि भाजपाच्या विजयासाठी निवडणूक प्रचाराच्या आखाड्यात सक्रिय व कृतिशील झाले आहेत. काँग्रेसमधील आपल्या शेकडो समर्थकांना त्यांनी भाजपात दाखल करून घेतल्यानंतर पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरलेली आहे. मागील अनेक वर्षे त्यांच्यावर जाहीरपणे मुक्ताफळे उधळणार्या चिखलीकर यांनी आता जिल्ह्यातील भाजपाचे नेतृत्व चव्हाणांकडे बहाल करून टाकलेले आहे.

या पार्श्वभूमीवर चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणे तसेच त्यानंतरच्या जाहीर सभेत जनसमुदायाला मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी येथे आलेल्या फडणवीसांवर चव्हाण यांची प्रशंसा करण्याचा प्रसंग आला. चव्हाण भाजपात आल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे, असे त्यांनी प्रारंभीच नमूद केले. त्यांच्यासारखा तुल्यबळ नेता भाजपात यावा, यासाठी आम्ही मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होतो, हे देखील फडणवीस यांनी नांदेडच्या जनतेसमोर जाहीर करून टाकले.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “लग्न एकाबरोबर आणि संसार…”

मागील काळातील प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडेंपासून आताच्या दानवे-फडणवीस यांच्यापर्यंतच्या भाजपा नेत्यांना नांदेडच्या राजकीय मैदानावर टीका करण्यासाठी पूर्वी शंकरराव चव्हाण आणि अलिकडच्या काळात अशोक चव्हाण व खतगावकर हे दोनच नेते समोर दिसत होते. शंकररावांवर पुत्रप्रेम, जावईप्रेम अशी टीका भाजपकडून नेहमीच झाली. अशोकरावांना लक्ष्य केले जात असताना भाजपा नेेते आदर्श तसेच पेडन्यूज व अन्य काही प्रकरणांचा उल्लेख मागील काळात करत असत. पण गुरुवारी येथे आलेल्या भाजपा नेत्यांना टीका करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराचे वा अन्य कोणत्याही नेत्याचे नाव घेता आले नाही.