नांदेड : हो, नाही म्हणत अखेर वंचित बहुजन आघाडीने नांदेड लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवाराचे नाव मंगळवारी जाहीर केले. गेल्या वेळी वंचितच्या उमेदवारामुळे तत्कालीन काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ल्यात पराभव झाला होता. यंदा वंचितच्या उमेदवाराचा कोणाला फटका बसणार याचा दोन्ही पक्षांकडून आढावा घेतला जात आहे.

वंचिततर्फे अविनाश भोसीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यावने यंदाची निवडणूकही तिरंगी झाली आहे. नांदेड मतदारसंघात १९९६च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांमध्ये लढत होत आली आहे. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या पारंपरिक मतांचे विभाजन करण्यासाठी अन्य प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले, तरी गेल्या २८ वर्षांतील सात निवडणुकांपैकी केवळ दोन निवडणुकांत काँग्रेस पक्षाला तिसर्‍या-चौथ्या उमेदवाराचा फटका बसला होता.

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra assembly election 2024 akot vidhan sabha constituency Prakash Bharsakale
अकोटमध्ये जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर?
Mehkar Assembly constituency shinde shiv sena thackeray shiv sena Siddharth Kharat Sanjay Raimulkar buldhana district
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत सामना, संजय रायमूलकर यांची घोडदौड सिद्धार्थ खरात रोखणार?
maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
mayura kale vs sumit wankhede arvi assembly constituency election
लक्षणीय लढत : खासदार पत्नी विरुद्ध फडणवीसांचे विश्वासू असा सामना

हेही वाचा… अभिनेते आणि खासदार अनुभव मोहंती आता भाजपाच्या मंचावर

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ने राज्यात काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या पराभवास हातभार लावला; त्यात नांदेडमधील अशोक चव्हाण हे एक होते. ‘वंचित’ची त्यावेळची एकंदर तयारी आणि हवा पाहता त्यांचा उमेदवार पाऊण ते एक लाखांपर्यंत मतं घेईल, असा अंदाज वर्तविला गेला; पण प्रा.यशपाल भिंगे यांनी १ लाख ६० हजारांहून जास्त मतं घेतल्यामुळे अशोक चव्हाण यांना पराभवास तोंड द्यावे लागले.

आता वंचितने दिलेले अविनाश भोसीकर हे लिंगायत-वाणी समाजातील कार्यकर्ते असून ओबीसींतील कार्यकर्त्यांची मोट बांधून निवडणुकीतल्या दोन प्रमुख मराठा उमेदवारांना आव्हान देण्याची जुळवाजुळव त्यांनी सुरू केली होती. ‘वंचित’ने आधी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षण आंदोलकांमधून एखादा सक्षम उमेदवार मिळतो का, याची चाचपणी करून पाहिली, पण जरांगे यांनी निर्णायकप्रसंगी मराठा उमेदवार न देण्याची भूमिका घेतल्यावर शेवटी आंबेडकर यांनी भोसीकर यांचे नाव जाहीर केले असले, तरी प्रा. डॉ. भिंगे यांच्यासोबत जशी कोरी पाटी, स्वच्छ प्रतिमा होती आणि उच्च विचारसरणी होती, तशी पार्श्वभूमी यावेळच्या उमेदवारामागे नाही, याकडे लक्ष वेधले जात आहे.

गेल्या निवडणुकीत आंबेडकरांना मानणार्‍या मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली होती. या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होणार का, हे पुढील टप्प्यात स्पष्ट होईल. पण भोसीकर यांच्या उमेदवारीनंतर आंबेडकरांना मानणार्‍या कार्यकर्त्यांंची एकंदर प्रतिक्रिया उत्साहवर्धक नाही. काँग्रेसला भोसीकरांपेक्षा जास्त चिंता आहे ती, अशोक चव्हाण व त्यांच्या हजारो समर्थकांच्या भाजपा प्रवेशामुळे घटणार्‍या मतांची. भाजपाने मागील निवडणुकीत पावणेपाच लाखांहून अधिक मतं घेतली. आता या पक्षाला त्यांत आणखी दोन लाख मतांची वाढ अपेक्षित आहे.

हेही वाचा…. तोट्यात असणाऱ्या ३३ कंपन्यांकडून ५४२ कोटी रुपयांचे रोखे दान, एकट्या भाजपाला मिळाले तब्बल…

गेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण-चिखलीकर लढतीत मराठा समुदायातील पाटील-देशमुख मंडळींनी जातीअंतर्गत भेद निर्माण केला, त्याचा चव्हाण यांना फटका बसला. पण आता दोन्ही उमेदवार खान्दानी ‘पाटील’ असल्यामुळे तो वाद नसला, तरी गावोगावच्या मराठा मतदारांचा राज्य सरकारसह भाजपावर रोष असल्यामुळे घटू शकणार्‍या मतांची भाजपालाही चिंता आहे.

जिल्ह्यातील लिंगायत समाजाचा कल नेहमीच भाजपाकडे राहिलेला आहे. या पक्षाने अलिकडे या समाजातील डॉ.अजित गोपछडे यांना राज्यसभेवर घेऊन आपल्या मतपेढीला आधीच आश्वस्त केल्यामुळे ‘लिंगायत कार्ड’ घेऊन निवडणुकीत उतरणार्‍या भोसीकर यांना त्याचा फार मोठा लाभ होणार नाही, असे याच समाजातील राजकीय निरीक्षकांना वाटते. पण मराठा विरुद्ध ओबीसी अशी विभागणी प्रचारादरम्यान झाली, तर त्याचा फटका भाजपा उमेदवारालाच बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… काँग्रेसला ‘ठोसा’ देत ऑलिम्पिक पदकविजेत्या बॉक्सरचा भाजपाच्या तिकीटावर निवडणुकीच्या ‘रिंग’मध्ये प्रवेश; कारण काय?

नांदेड मतदारसंघात यावेळी दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असून ही मतं काँग्रेसच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून सुरू झाला होता. आता निवडणुकीत भोसीकरांच्या रुपाने तिसरा उमेदवार आला, तरी बौद्ध व इतर मतदार आंबेडकरांच्या उमेदवाराला साथ देणार नाहीत, असे काँग्रेसच्या समर्थकांना वाटते. तिसर्‍या उमेदवारामुळे काँग्रेस आणि भाजपा या दोघांवरही आपली ‘मतपेढी’ सुरक्षित व भक्कम राखण्याची वेळ आली आहे.