संजीव कुळकर्णी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनापूर्वीच शिवसेनेला  मोठे खिंडार पडले आहे. जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे बंधन हाती बांधणार असल्याची चर्चा आहे. उद्धव  ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…

राज्यातील सत्तांतरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी शिवसेनेला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी ‘मातोश्री’ची साथ सोडत शिंदे गटात सहभागी होऊन उद्धव ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का दिला. आमदार कल्याणकर, खासदार पाटील यांच्या ‘शिंदेशाही’तील सहभागाला नांदेडमधील शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठा विरोध दर्शविला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोमवारच्या दौऱ्यात नांदेड उत्तर मतदारसंघातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार असून शहरात एक मोठा मेळावाही खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पुढाकारातून पार पडत आहे. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याची धामधूम सुरू असतानाच नांदेडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नांदेड उत्तर भागातील ‘सरकार’ अशी ओळख असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला असून ते सोमवारी शिंदे सेनेत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासमवेत शेतकरी शेतमजूर सेनेचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले (मालेगावकर), अर्धापूरचे तालुकाप्रमुख संतोष कपाटे, मुदखेडचे तालुकाप्रमुख संजय कुर्हे, धर्माबादचे तालुकाप्रमुख आकाशरेड्डी येताळकर, भोकरचे तालुकाप्रमुख अमोल पवार, माजी तालुकाप्रमुख जयवंत कदम आदी शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

उमेश मुंडे यांच्याकडे मुखेड, नायगाव, देगलूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी शिवसेनेने सोपविली होती. मुंडे हे शिंदेसेनेत दाखल होत असल्यामुळे या तीनही मतदारसंघांतील बहुतांश पदाधिकारी त्यांच्यासमवेत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यातील शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारीही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याची चर्चा सुरू आहे.मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये शिवसेनेत राजकीय भूकंप झाला आहे, शिवसेनेच्या गडाला हा मोठा हादरा मानला जात असून मुंडे यांच्या पाठोपाठ आणखी कोणते शिलेदार ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चौकटमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी उमेश मुंडे यांनी खासदार हेमंत पाटील यांची सदिच्छा भेट घेत, आपला निर्णय जाहीर केला. या वेळी त्यांच्यासमवेत प्रल्हाद इंगोले यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मुंडे यांचे खासदार पाटील यांच्यासमवेतचे छायाचित्र समाजमाध्यमांमध्ये झळकताच शिवसेनेत एकच खळबळ उडाली.

Story img Loader