नाशिक : अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या जाहीर सभेत भाषण करणाऱ्याला भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी देणे आणि नांदगाव तहसीलदार कार्यालय परिसरात कार्यकर्त्याला धमकावल्याप्रकरणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवीगाळ, मारामारी केल्यावर आणि त्याचे पुरावे सापडल्यावर गुन्हा दाखल होणारच, असे सांगत छगन भुजबळ यांनी याप्रकरणात कांदेंना लक्ष्य केले आहे. नांदगावमधून छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ अपक्ष म्हणून मैदानात उतरल्यानंतर कांदे-भुजबळ वादाला धार चढली आहे.

शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे (अजित पवार) मुंबईचे माजी अध्यक्ष समीर भुजबळ यांनी दंड थोपटत दहशतीच्या छायेतून नांदगावला बाहेर काढण्याचे आवाहन केल्यापासून भुजबळ आणि कांदे यांच्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. कांदेंनी भुजबळ काका-पुतण्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवत कधीकाळी नाशिकमधील गुन्हेगारीला भुजबळ हे जबाबदार असल्याचे आरोप केले. या वादात नवीन अध्याय जोडले जात आहेत.

vanchit Bahujan aghadi
परभणीत ‘वंचित’च्या उमेदवाराचा अर्ज छाननीत अवैध, जिल्ह्यातल्या चार मतदारसंघात १९२ अर्ज पात्र
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
raigad vidhan sabha
रायगडच्या राजकारणात नामसाधर्म्याचा पुन्हा प्रयोग, मतदारांच्या मनात गोंधळ उडविण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

हेही वाचा :राजकारणातील बड्या चेहऱ्यांची यंदा वंचितकडे पाठ

जैन धर्मशाळेजवळील समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आपले भाषण संपताच विरोधी उमेदवार सुहास कांदेंचा भ्रमणध्वनी आला. त्यांनी शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शेखर पगार यांनी दिली. सभेत त्यांनी भ्रमणध्वनीवरील कांदे यांचे बोलणे उपस्थितांना ऐकवले.

दुसरा प्रकार नांदगाव तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात घडला. याबाबत विनोद शेलार यांनी तक्रार दिली. भुजबळ यांचा अर्ज भरण्यासाठी आपण तहसीलदार कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी कांदेंनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे कांदे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा :बंडखोरीमुळे गडचिरोलीत महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ, गडचिरोलीतील तीन विधानसभेत काँग्रेसकडून ७ तर भाजपचे दोघे अपक्ष लढण्यावर ठाम

विरोधी म्हणून बघा, शत्रू म्हणून नव्हे

मतदारसंघातील या घटनाक्रमावर अजित पवार गटाचे नेते आणि समीर यांचे काका छगन भुजबळ यांनी टिप्पणी केली. उपरोक्त घटनांची चित्रफीत बघितली. कोणी शिवीगाळ केली, मारामारी केल्यास गुन्हा दाखल होणे स्वाभाविक आहे. समाजमाध्यमात या घटनांचे पुरावेही पोलिसांना मिळाले. प्रतिस्पर्धी उमेदवाराकडे विरोधी पक्ष म्हणून बघावे, शत्रू म्हणून नव्हे, असेही त्यांनी सूचित केले.