नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. आजवरच्या प्रत्येक निवडणुकीत राज्यात सर्वत्र प्रचारात सहभागी होणारे भुजबळ लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मात्र एकदम निवांत आहेत. महायुतीच्या कुठल्याही प्रचार सभेत ते दिसत नाहीत. साक्षात दिल्लीश्वर प्रसन्न असतानाही महायुतीने नाशिकमधून त्यांना उमेदवारी देणे टाळले. प्रचारातही अजित पवार गटासह शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि त्यांच्या उमेदवारांनी भुजबळांपासून अंतर राखले आहे. त्यामुळे ओबीसी नेते भुजबळ हे सध्या महायुतीत असूनही प्रचारापासून दूर असल्याचे दिसत आहे.

नाशिकच्या जागेवरून तीनही पक्षात शिगेला पोहोचलेला संघर्ष शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीने संपुष्टात आला. तत्पूर्वीच जागा वाटपास विलंब झाल्यामुळे उमेदवारीच्या स्पर्धेतून भुजबळ यांनी स्वत: माघार घेऊन मार्ग मोकळा केला होता. स्थानिक पातळीवरील विरोधामुळे भाजपही भुजबळांसाठी नंतर आग्रही राहिली नाही. अजित पवार गटाने हा विषय प्रतिष्ठेचा केला नाही. तडजोडीत शिंदे गटाला जागा देत भाजपने आपल्या बालेकिल्ल्यावरील हट्ट सोडून दिला. नाशिकची जागा शिंदे गटाकडे देण्याचे निश्चित झाल्यानंतर सर्वप्रथम भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे सक्रिय झाले. त्यांनी ओबीसी नेते भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. भुजबळ फार्म येथे त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. नाशिकच्या जागेचा विषय निकाली निघाला. पण, आजतागायत चंद्रपूरचा अपवाद वगळता भुजबळ कुठेही प्रचारात सहभागी झालेले नाहीत. ते प्रचारात सक्रिय झाल्यास राज्यात मराठा-ओबीसी वादाला नव्याने धार चढेल, अशी धास्ती महायुतीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे अजित पवार गटच नव्हे तर, मित्र पक्षांचे उमेदवार देखील त्यांना प्रचारात सहभागी करण्यास फारसे उत्सुक नाहीत.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी

हेही वाचा : अमेठीतले काँग्रेस उमेदवार केएल शर्मा कोण आहेत? राजीव गांधींशी काय आहे कनेक्शन?

भुजबळ यांनी अलीकडेच त्यास दुजोरा दिला होता. आपल्या प्रचारातील सहभागामुळे मराठा समाजाची मते कमी होतील, असे काही उमेदवारांना वाटू शकते. ज्यांना ही धास्ती वाटत नाही, त्यांनी निमंत्रित केल्यास संबंधितांच्या प्रचारात सहभागी होण्याची तयारी भुजबळांनी दर्शविली होती. राज्यात महायुतीच्या नेत्यांच्या सर्वत्र प्रचार सभा सुरू असून यामध्ये भुजबळ कुठेही नाहीत. चंद्रपूर मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा झाली होती. हा एकमेव अपवाद वगळता महायुतीने प्रचारापासून त्यांना दूर ठेवले आहे. खुद्द अजित पवार गटाने बारामती, शिरूर, रायगड आणि उस्मानाबाद या आपल्या जागांवरील प्रचारात त्यांना सहभागी केलेले नाही. नाशिक लोकसभेसाठी शिंदे गटाच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करताना निघालेल्या फेरीत भुजबळ उपस्थित होते. त्यांचा प्रचारात सहभाग नसल्याच्या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळ हे महायुतीतील तीन प्रमुख नेत्यांपैकी एक असल्याचे म्हटले होते. संपूर्ण राज्यातील प्रचारात त्यांचा वेगळ्या पध्दतीने सहभाग आहे. ओबीसी संघटना आणि कार्यकर्त्यांच्या दृकश्राव्य माध्यमातून बैठका घेऊन ते बुथस्तरीय कार्यकर्त्यांपर्यंत संदेश देत आहेत. मोठी सभा घेण्याची आवश्यकता नाही. आपणही मोठी सभा घेत नाही. राजकीयदृष्ट्या संघटनेला कामाला लावणे हे नेत्यांचे काम असते. भुजबळांसह आपण ते काम करीत असल्याचा दाखला बावनकुळे यांनी दिला होता. मुुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुजबळ हे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी असून तिकीट वाटपाचा निर्णय झाल्यावर सर्व एकदिलाने काम करतील. असा दावा केला होता. पण, राज्यातील प्रचारात भुजबळ कुठे शोधूनही सापडत नाहीत, असे चित्र आहे.

Story img Loader