नाशिक शहरातील चारपैकी नाशिक मध्य व नाशिक पूर्व या दोन मतदारसंघात परंपरागत मतदारांचा दाखला देत ते आपल्याकडे राखण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा परंपरागत मतदार पाठिशी उभा राहिल्याने महाविकास आघाडीला राज्यात लक्षणीय यश मिळाल्याचे सूत्र मांडत विधानसभेच्या जागा वाटपात अधिकाधिक जागांवर दावा करण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. त्याच अनुषंगाने बुधवारपासून नाशिकसह संपूर्ण राज्यात विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज भरून घेण्यास सुरुवात करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील चारही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी काँग्रेसने उमेदवारी अर्ज उपलब्ध केले आहेत. बुधवारपासून हे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. पक्षाच्या नियमावलीनुसार उमेदवारांची माहिती अर्जात भरून घेतली जाईल. समवेत पक्षनिधी भरावा लागेल. इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे.

mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Dr Kartik Karkera from Mumbai
मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा नाशिक मविप्र मॅरेथॉन -२०२५ चा विजेता, पहिले तीनही धावपटू महाराष्ट्रातील
Nashik will be connected to the proposed Vadhvan port
प्रस्तावित वाढवण बंदराबरोबर नाशिक जोडणार
survey licenses for qualified hawkers are stalled
पिंपरी : डिजिटल स्वाक्षरीअभावी दोन वर्षांपासून परवान्यांंचे वितरण रखडले
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Nashik Municipal Commissioner Manisha Khatri directed pwd to fix potholes immediately
नाशिक खड्डेमुक्त करण्याची सूचना; मनपा आयुक्तांनी खडसावले
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या

हेही वाचा… रशियातील पंतप्रधान मोदींच्या भाषणात ‘अस्त्रखान हाऊस ऑफ इंडिया’चा उल्लेख; त्याचे गुजरात कनेक्शन काय?

नाशिक लोकसभेच्या निकालामुळे विधानसभेची समीकरणे बदलतील, असे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना वाटते. सध्या शहरातील तीन मतदारसंघात भाजपचे तर, देवळालीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत नाशिक मध्य व देवळालीत महायुतीला आघाडी मिळाली नव्हती. ही समीकरणे लक्षात घेऊन महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी विधानसभेची तयारी चालविली असताना काँग्रेसने इच्छुकांचे थेट अर्ज भरून घेत पुढचे पाऊल टाकले. २०१९ मध्ये काँग्रेसने नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व या दोन जागा लढविल्या होत्या. यातील नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील द्वितीय स्थानी तर नाशिक पूूर्वमध्ये पक्षाचा उमेदवार स्पर्धेतही नव्हता. काँग्रेसने नव्याने सुरू केलेल्या तयारीने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… कुर्मी मतांना आपलेसे करण्याचा प्रयत्न; उत्तर प्रदेश-झारखंडच्या निवडणुकीसाठी जेडीयूची तयारी

शहरातील चारही जागांवर काँग्रेसचा दावा असून नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व या दोन मतदारसंघात काँग्रेसला मानणारा मोठा मतदार आहे. त्यामुळे किमान या दोन जागा काँग्रेस लढविणार आहे. मागील निवडणुकीत त्या काँग्रेसकडे होत्या. नवमतदार नोंदणी मोहीम राबवत पक्ष सुक्ष्मपणे काम करीत आहे. – आकाश छाजेड (शहराध्यक्ष, काँग्रेस)

Story img Loader