नाशिक : अवघ्या सहा महिन्यात मालेगाव, धुळे पाठोपाठ नाशिक या तीन ठिकाणी प्रसिध्द कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवपुराण कथा सोहळ्याच्या आयोजनातून शिवसेना आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतपेरणी सुरू केल्याचे मानले जात आहे. नाशिकमध्ये पाच दिवसीय सोहळा लाखोंच्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यात शिवसेना, भाजपसह राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) मंत्री, वरिष्ठ नेते आणि आमदारांचा गोतावळा जमला होता.

पाथर्डी गावालगतच्या विस्तीर्ण मैदानावर पंडित मिश्रा यांच्या श्री शिवपुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि हेमंत गोडसे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. आमदार सीमा हिरे आणि राहुल ढिकले, राष्ट्रवादीचे आमदार (अजित पवार गट) दिलीप बनकर आणि सरोज अहिरे आदी नेत्यांनी हजेरी लावली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही उपस्थित राहण्याची इच्छा होती. मात्र कार्यक्रमाची वेळ आणि त्यांच्या नाशिक दौऱ्यातील कार्यक्रम यांचे समीकरण न जुळल्याने त्यांना शक्य झाले नाही. या भव्य सोहळ्याचे आयोजन महाशिवपुराण कथा उत्सव सेवा समितीने केले होते. समितीत सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग होता. पण, त्याची प्रमुख धुरा शिवसेना व मुख्यत्वे पालकमंत्री दादा भुसे यांच्या खांद्यावर राहिली. मालेगाव या स्वत:च्या मतदार संघात भुसे यांनी पहिल्यांदा हा कार्यक्रम घेतला होता. तिथे लाखो भाविकांचा प्रतिसाद मिळाला. तेथील भोजन आणि आसन व्यवस्थेने पंडित मिश्रा हे देखील प्रभावित झाले होते. त्यामुळे महाराष्ट्रासह परराज्यातील कार्यक्रमांत त्यांनी मालेगावातील अतिशय नेटक्या नियोजनाबद्दल भुसे यांचे कौतुक केल्याचे सांगितले जाते.

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू

हेही वाचा : अमरावतीत ‘इंडिया’ आघाडीत उमेदवारीवरून संभ्रमावस्‍था

धार्मिक कार्यक्रमात लाखो भाविक उपस्थित राहतात. आयोजक म्हणून मिरवता येते. कार्यक्रम यशस्वीतेचे श्रेयही मिळते. लाखो मतदारांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव पडतो. मालेगावनंतर धुळे येथील धार्मिक सोहळ्यासाठीही भुसे यांनी पुढाकार घेतला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते धुळ्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे मालेगावला लागून असणाऱ्या या जिल्ह्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. नियमित संपर्क भविष्यात धुळे लोकसभा मतदार संघात कामी येतील, असे गृहितक मांडले जाते. धुळे लोकसभेत नाशिकमधील मालेगाव मध्य आणि बाह्य, बागलाण तर धुळ्यातील शिंदखेडा, धुळे शहर आणि धुळे ग्रामीण अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. भुसे हे मुलगा आविष्कारसाठी या मतदारसंघात भविष्यातील तरतूद म्हणून हा सर्व खटाटोप करत असल्याचे विरोधकांचे मत आहे. नाशिकमधील कार्यक्रमाकडे लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून पाहिले जाते. सध्या या ठिकाणी शिवसेनेचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. भाजप या मतदार संघावर दावा सांगण्याच्या तयारीत आहे. राजकीय संघर्षात शिवसेनेचा खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची मालेगावनंतर नाशिक येथील श्रीशिवपुराण कथा सोहळ्यातील उपस्थिती तेच अधोरेखीत करते.

हेही वाचा : रायगडातील शिवसेना भाजपमधील वादात देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी होणार का ?

“धार्मिक कार्यक्रम कुणीही आयोजित करू शकते. त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. केवळ त्याला राजकीय स्वरुप देऊ नये. आयोजकांनी आम्हाला निमंत्रित केले होते. परंतु, नियोजनात आमच्याकडून स्वयंसेवक घेतले नाहीत. इतर पक्षांचा सहभाग नव्हता. नाशिकमधील कार्यक्रम चांगला झाला. पण तो केवळ शिवसेना या एकाच पक्षापुरता मर्यादित राहिला. निवडणुकीच्या तोंडावर असे धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. निवडणुकीनंतरही ते आयोजित करावेत.” – गजानन शेलार (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट)

हेही वाचा : पुण्यात मुरलीधर मोहोळ – जगदीश मुळीक यांचे उमेदवारीसाठी असेही शक्तिप्रदर्शन !

“कथाकार पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांची वेळ मिळण्यास दोन, तीन वर्ष प्रतिक्षा करावी लागते. या धार्मिक सोहळ्यांचा निवडणुकीशी कुठलाही संबंध नाही. जळगावमध्येही आता कार्यक्रम होणार आहे. नाशिकच्या कार्यक्रमाचे निमंत्रण सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. सर्व नाशिककरांनी त्याचे आयोजन केले. एका विशिष्ट पक्षाचा संबंध नव्हता. स्वयंसेवकाबाबतचे आक्षेप तथ्यहीन आहेत. स्वयंसेवकाने निमंत्रणाची वाट पाहण्याची गरज नसते. ज्याला आवड होती, वेळ होता, ते सारे सहभागी झाले. यानिमित्ताने मोठा जनसमुदाय जमला. त्यांचे आदरातिथ्य करता आले. आम्ही या सोहळ्यात व्यासपीठावर नव्हतो.” – दादा भुसे , नाशिकचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री, सार्वजनिक उपक्रम

Story img Loader