नाशिक : शहरातील नागरी समस्यांविषयी एरवी नागरिकांनी कितीही ओरड केली तरी लक्ष न देणारे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच सजग झाले आहेत. नाशिककर सध्या खड्ड्यांमुळे बेजार झाले असून महापालिका प्रशासनाकडून त्याविषयी कोणतीही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ प्रारंभी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी या विरोधी पक्षांनी आवाज उठविल्यानंतर आता भाजप, मनसेही याप्रश्नी आक्रमक झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून आंदोलनांसाठी वेगवेगळ्या पध्दतींचा अवलंब केला जात असून आंदोलनांसाठी चाणाक्षपणे आपले वर्चस्व असलेल्या भागाची निवड केली जात असल्याने आंदोलनांमध्येही राजकारण केले जात आहे.

पावसाळा सुरु होण्याआधी शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणावर सुमारे १५० कोटी खर्च करण्यात आले. त्यामुळे रस्ते चकाचक झाले असताना संततधारेनंतर त्यांचे खरे स्वरुप उघडे पडले. सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे असे चित्र सर्वत्र दिसू लागले. शहरात जवळपास २३०० किलोमीटरचे रस्ते आहेत. या सर्वच रस्त्यांना खड्डे पडले. पावसात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होऊ लागले. तोपर्यंत, हा विषय सर्वच राजकीय पक्षांच्या लेखी बेदखल होता. परंतु, वाढत्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी यामुळे नाशिककरांमध्ये असंतोष वाढू लागल्यावर राजकीय पक्षांकडून दखल घेण्यास सुरुवात झाली. शिवसेना ठाकरे गटातर्फे सिडकोनंतर जेलरोड परिसरात बैलगाडी आणि घोड्यांवर स्वार होऊन आंदोलन करण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनही हा प्रश्न मांडला गेला. मनसेकडून खड्ड्यांमध्ये मडकी फोड आंदोलन करण्यात आले.

nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
all 1676 polling stations in Nashik and Malegaon have CCTV and live webcast
नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण
Action against those who lure voters in Malegaon
मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

हेही वाचा : TMC : कोलकाता बलात्कार प्रकरणावरून ममता बॅनर्जी गटाचे खासदार अभिषेक बॅनर्जींशी मतभेद? पक्षात दोन गटांची वेगळी मतं!

विरोधक खड्ड्यांविषयी आक्रमक झाल्यानंतर सत्ताधारी भाजपचे आमदार देवयानी फरांदे आणि राहुल ढिकले यांनी थेट महापालिका आयुक्त डाॅ. अशोक करंजकर यांची भेट घेऊन खड्ड्यांसह अनेक भागात कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा, डेंग्यूचे वाढते रुग्ण हे विषय मांडत आठ दिवसांत यासंदर्भात सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाकडून खडी आणि मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत असले तरी जोराचा पाऊस आल्यावर हे खड्डे पुन्हा उघडे पडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरात सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी करण्यात येत असून खड्ड्यांसह इतर नागरी समस्यांप्रश्नी आंदोलन करतानाही आपल्या पक्षाचा दावा ज्या मतदारसंघांवर आहे, अशा ठिकाणी प्राधान्य देण्यात येत आहे.