अनिकेत साठे

शिवसेनेचे तत्कालीन ज्येष्ठ नेते आणि नगरविकासमंत्री राहिल्याने महापालिकेतील पक्षाच्या बहुतांश नगरसेवकांचा त्यांच्याशी संबंध येत गेला. शिंदे यांना भाजपशी युती केल्यानंतर मुख्यमंत्रिपद मिळाले असले तरी या गटाचे भवितव्य काय असेल, हे जोखूनच वैयक्तिकदृष्ट्या राजकीय कारकीर्दीचा विचार नगरसेवक करतील. एकदम कुणी हवेत उडी घेणार नाही. महापालिका निवडणुकीस वेळ आहे. त्यामुळे कुणाला घाई नाही. म्हणूनच खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात दादा भुसे आणि सुहास कांदे या बंडखोरांच्या काही समर्थकांचा अपवाद वगळता सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली असली तरी कुणाच्या मनात काय याचा थांग लागणे अवघड आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिक येथे पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा मेळावा झाला. समस्त माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर एकत्र आणत नाशिकची शिवसेना जागेवरच असल्याचे राऊत यांनी छातीठोकपणे सांगितले. पण ती जागेवर असल्याची कारणे नंतर महापालिकेच्या राजकारणात मुरलेल्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी खासगीत उलगडली. म्हणजे कुंपणावर बसलेले अंदाज घेत आहेत.

आशीष जयस्वाल यांच्या मंत्रिपदाला रामटेक भाजपमधून विरोध

मेळाव्यात सेनेचे खासदार हेमंत गोडसे हे अनुपस्थित राहिले. दिल्लीतील खासदारांच्या बैठकीत ते सहभागी झाल्याची चर्चा होती. मुंबई, ठाण्यानंतर नाशिक हा सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. कालांतराने ती ओळख पुसट झाली. पण, शिवसेनेच्या लेखी नाशिकचे महत्त्व अबाधित राहिले. त्यामुळे आमदारांच्या बंडखोरीनंतर संघटनात्मक पडझड रोखण्यासाठी राऊत यांनी पहिल्यांदा नाशिकला धाव घेतली. उत्तर महाराष्ट्रातून दोन मंत्र्यांसह एकूण आठ (सेना पुरस्कृत दोघांसह) आमदार शिंदे गटात सहभागी झाले. पक्षात बंडखोरी न केलेला विधानसभेचा एकही आमदार सध्या उत्तर महाराष्ट्रात राहिलेला नाही. फुटीचे ग्रहण संघटनेला लागू नये म्हणून शक्ती प्रदर्शनातून राऊत यांनी बंडखोरांना आव्हान दिले. जळगावचे माजी पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी राऊत यांना लक्ष्य केले होते. त्याची परतफेड मेळाव्यात झाली.

शिंदे सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी नाही

पक्षाने मानसन्मान देऊनही ते एका रात्रीत पळून गेले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेतला. याकडे लक्ष वेधत एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री असल्याचे अधोरेखित करण्यात आले. बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांना एकसंधपणे उभे करण्याचा प्रयत्न मेळाव्यातून झाला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरांना शेलक्या शब्दात सुनावले. मात्र, राऊत यांनी नाशिकच्या बंडखोर आमदारांचा नामोल्लेख करणे टाळले.

माजी कृषिमंत्री तथा मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे हे शिंदे गटात गेले आहेत. ठाणे, नवी मुंबईत पक्षाचे नगरसेवक बंडाचे निशाण फडकावत असताना नाशिकमध्ये तशी परिस्थिती अद्याप तरी नाही. बंडखोरी करणाऱ्यांचा नाशिक महापालिकेत प्रभाव नाही. शहर आणि ग्रामीण भागात राऊत यांनी संघटनात्मक बांधणी केली आहे. त्यामुळे नाराजांपेक्षा स्थानिक पातळीवर त्यांना मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे. भुसे गटाचा मालेगाव महापालिकेत वरचष्मा आहे. नगरविकास खात्यामुळे नाशिकच्या नगरसेवकांचे शिंदे यांच्याशी संबंध येत गेले. त्यामुळे त्यांच्यादृष्टीने राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती चिंतेचा विषय आहे. तूर्तास बंडखोरीचे पडसाद उमटले नसले तरी भविष्यातील परिणाम टाळण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राऊत यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. पण त्यांनी नाशिक वगळता धुळे, जळगाव आणि नंदुरबारकडे फारसे लक्ष दिलेले नाही. पारोळा-एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांनी माजीमंत्री गुलाबराव पाटील यांच्या त्रासाला वैतागून पक्ष सोडल्याचे म्हटले आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये शिवसेना वाढू दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत पक्षाकडे वारंवार दाद मागूनही दखल घेतली गेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. उत्तर महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यावर वेळीच उपाय न शोधल्याची किंमत पक्षाला मोजावी लागल्याची शिवसैनिकांची भावना आहे.

Story img Loader