जयेश सामंत

नवी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नवी मुंबईसारख्या शहरात अस्तित्वासाठी झगडणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वर्षभरानंतर संघटनेच्या पुर्नबांधणीसाठी नियुक्त्यांचे सत्र सुरु केले असून बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या महानगर प्रमुख पदी माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांची नेमणुक करताना अनेक वर्षाने या भागात आगरी-शहरी असे नेतृत्वाचे समिकरण जुळविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Nitin Gadkari on Omraje Nimbalkar
Maharashtra News Highlights : “ताजमहल लवकर बांधून झाला पण..”, ठाकरेंच्या खासदाराचा संसदेत मराठीत प्रश्न, नितीन गडकरींनी दिले ‘असे’ उत्तर
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
The winter session of Legislature starts December 16 in Nagpur as per Agreement
नागपुरात दरवर्षी विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याबाबत यशवंतराव चव्हाणांचीभूमिका काय होती ?
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख पद पक्षाचे ज्येष्ठ नेते विठ्ठल मोरे यांच्याकडे आहे. कोकणातील खेड तालुक्यात जन्मगाव असलेले मोरे हे मराठा समाजातील आहेत. नवी मुंबईतील गावागावांमधून असलेला आगरी-कोळी समाजाचा प्रभाव लक्षात घेता मोरे यांच्या सोबतीला वास्कर या तुलनेने तरुण चेहऱ्याला पक्षाने नेतृत्वाची संधी दिली आहे.

हेही वाचा… शरद पवार कोल्हापूरमध्ये कोणती भूमिका मांडणार? छत्रपती शाहू महाराज सभेच्या अध्यक्षस्थानी

गणेश नाईक यांच्या बंडापासून नवी मुंबईत शिवसेनेला कधीही सत्तेपर्यत पोहचला आले नाही. असे असले तरी आठ वर्षांपुर्वी झालेल्या राज्यातील सत्ता बदलानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आणि त्यांनी नाईकांचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईत लक्ष देण्यास सुरुवात केली. नाईकांच्या गोटात असलेले तसेच काॅग्रेस पक्षातील तेव्हाचे काही प्रभावी नगरसेवक शिंदे यांनी शिवसेनेत आणले आणि महापालिका निवडणुकीत १३ चे ३७ नगरसेवक निवडून आणले. यापैकी बरेचसे नगरसेवक हे नाईकांच्या गोटातील काही काॅग्रेस पक्षातील होते. पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच गणेश नाईक यांच्या गटातील आणखी काही प्रभावी नगरसेवक शिवसेनेत सामील झाले. ठाण्याचे खासदार राजन विचारे हे या फोडाफोडीच्या राजकारणासाठी आग्रही होते.

हेही वाचा… उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिंदे गटाकडून कावड यात्रेची फलकबाजी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मात्र नवी मुंबईतील राजकीय गणित पुर्णपणे बदलले. मुख्यमंत्रीपदाची माळ शिंदे यांच्या गळ्यात पडल्याने पक्षाचे ३५ पेक्षा अधिक माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला अक्षरश: खिंडार पडले. असे असले तरी बेलापूरचे विठ्ठल मोरे आणि ऐरोलीचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी मात्र ठाकरे यांची साथ सोडली नाही. या दोघांसोबत जेमतेम सहा नगरसेवक पक्षासोबत राहीले. मागे राहीलेले काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना सोबत घेऊन पक्षाने लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा पुर्नबांधणीचा कार्यक्रम हाती घेतला असून बेलापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणा गुरुवारी सामनातून करण्यात आली.

हेही वाचा… ‘एकला चलो’तून मायावतींचे काँग्रेसशी छुप्या युतीचे संकेत?

मोरेंचा प्रभाव, आगरी नेतृत्वाची नवी खेळी

बेलापूर विधानसभा मतदारसंघात महानगर प्रमुख हे पद नव्याने निर्माण करत असताना सानपाडा भागातील पक्षाचे तरुण नगरसेवक सोमनाथ वास्कर यांच्य रुपाने आगरी समाजाकडे नेतृत्व सोपविण्याचा प्रयोग पक्षाने बऱ्याच वर्षाने केला आहे. नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख पद द्वारकानाथ भोईर यांच्याकडे असले तरी बेलापूर विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षापासून आगरी समाजाला नेतृ्त्वाच्या फळीत स्थान मिळाले नव्हते. शिवसेना एकसंघ असतानाही विजय नहाटा, विजय चौगुले यांच्यासारख्या नेत्यांकडे पक्षाचे नेतृत्व होते. २००० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांना टक्कर देताना दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी देसाई गावातील सिताराम भोईर या आगरी उमेदवाराची निवड केली होती. यानंतर बेलापूर विधानसभा क्षेत्रात वास्कर यांच्या रुपाने प्रथमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आगरी नेत्यासाठी महानगर प्रमुख पदाची निर्मीती करत मोरे-वास्कर या मराठा-आगरी नेतृत्वाची नवी आखणी करण्याचा प्रयोग केला आहे.

हेही वाचा… ठाणे जिल्हा नियोजन समितीला पालकमंत्र्यांची प्रतीक्षाच

जुन्यांना बढती

बेलापूर विधानसभा मतदारसंघात नव्या नियुक्त्या जाहीर करत असताना जुन्याच पदाधिकाऱ्यांना बढती देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. वाशी, सानपाडा, नेरुळ, सीवूडस, बेलापूर, तुर्भे यासारख्या उपनगरामधील जुन्या पदाधिकाऱ्यांना उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख अशा पदांवर बढती देण्यात आली आहे. या नियुक्त्यांमध्ये जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांचा शब्द अंतिम मानण्यात आल्याचे स्पष्ट होत असून त्यांचा मुलगा अवधूत यांना वाशीत विभागप्रमुख पदावर नियुक्त करण्यात आले आहे. पक्षातील फुटीनंतर खासदार राजन विचारे यांनीही मोरे यांच्यासोबत जुळवून घेतल्याचे हे निदर्शक मानले जात आहे.

Story img Loader