संतोष प्रधान

अजित पवार व सुनील तटकरे यांचे घनिष्ठ संबंध वगळता प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील वा हसन मुश्रीफ या पहिल्या फळीतील नेत्यांचे अजितदादांशी कधीच फारसे सख्य नव्हते. पण भाजपबरोबर घरोबा करण्याकरिता या साऱ्या नेत्यांनी अजित पवारांशी जुळवून घेतले. हे सारे सत्तेसाठी वा केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्याकरिताच असावे, असे चित्र दिसत आहे.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
News About Rahul Narwekar
Rahul Narwekar : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड निश्चित; अर्ज भरताच विरोधकांवर टीका “विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास…”

राष्ट्रवादीच्या चौकटीत पक्षाध्यक्ष शरद पवार हे सर्व नेत्यांशी संवाद साधत असत. निर्णय प्रक्रियेत नेतेमंडळींना सामील करून घेत. पवारांनी सर्व तरुण नेत्यांना १९९९ मध्ये लोकशाही आघाडी सरकारच्या काळात प्रोत्साहन दिले व महत्त्वाची मंत्रिपदे दिली. अजित पवार हे सुरुवातीपासूनच नेतेमंडळींशी फटकून वागत असत. सुनील तटकरे वगळता पहिल्या फळीतील कोणत्याच नेत्यांशी त्यांचे फारसे सख्य नव्हते.

हेही वाचा… नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेची अधिक अडचण

प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात. यूपीए सरकारच्या काळात पटेल हे पवारांच्या सावलीसारखे असत. पण पटेल आणि अजित पवार यांच्यात कधीच फारसे सख्य नव्हते. याउलट एक-दोन बैठकांमध्ये या दोन नेत्यांमध्ये खटके उडाल्याचे सांगितले जाते. २००९च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा मतदारसंघातून प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंडखोरी केली होती. तेव्हा राष्ट्रवादीतूनच पटोले यांना रसद पुरविल्याची चर्चा होती. पटेल यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याकरिता पटोले यांच्या प्रचारार्थ एम. एच. १२ व एम.एच. १४ नोंदणीच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये नोंदणी झालेलेल्या गाड्या कोणी पाठविल्या, असा सवाल तेव्हा करण्यात आला होता. स्थानिक पातळीवर त्याची चर्चाही झाली होती.

हेही वाचा… सोलापूरमध्ये अजित पवार यांनाच अधिक पाठबळ

छगन भुजबळ व अजित पवार यांचेही कधीच फारसे सख्य नव्हते. भुजबळांवर तेलगी घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा राष्ट्रवादीच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचा मुद्दा अजित पवारांनीच उपस्थित केला होता, असे तेव्हा प्रसिद्ध झाले होते. २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर आपल्याला डावलून भुजबळांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर अजित पवार संतप्त होऊन पक्षाच्या मुख्यालयातून तडक निघून गेले होते.

हेही वाचा… धर्मरावबाबांच्या मंत्रीपदामुळे भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता !

पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांचेही फारसे जमले नाही. वळसे-पाटील हे पूर्वी शरद पवार यांचे स्वीय सचिव होते. वळसे-पाटील यांच्या मतदारसंघात अजित पवार यांनी वळसे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने तेव्हा चर्चाही झाली होती. २००९ मध्ये मंत्रिपदाऐवजी विधानसभा अध्यक्षपद स्वीकारावे लागेल यामागे अजित पवार असल्याचा समज वळसे-पाटील यांचा झाला होता. हसन मुश्रीफ हे कायमच शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. यामुळेच तटकरे वगळता राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील एकाही नेत्याचे अजित पवार यांच्याशी फारसे सख्य नव्हते.

ही वस्तुस्थिती असली तरी भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्यासाठी ही सारी नेतेमंडळी अजित पवार यांच्याबरोबर संघटित झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. सत्तेची हाव किंवा ईडी वा अन्य केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्याकरिताच हे सारे एकत्र आले असावेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Story img Loader