नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी झालेल्या सभेत दोन बिगरबाजप मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता विरोधी पक्षांचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिल्याने लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधी वातावरण निर्मिती झाली असली तरी, ‘इंडिया’च्या शक्तिप्रदर्शनात अंतर्विरोधही समोर आले. दिल्लीत सुरात सूर, राज्यांत ‘इंडिया’ बेसूर अशी परिस्थिती काही राज्यांत तरी दिसत आहे.

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी भाषणामध्ये ‘इंडिया’तील घटक पक्षांमधील जागावाटपाच्या मतभेदावर अचूकपणे बोट ठेवले. भाजपविरोधात आपण सर्वांनी एकीने लढले पाहिजे. आपल्यामध्ये एकजूट नसेल तर भाजपला आपण आव्हान देऊ शकत नाही. ‘इंडिया’तील घटक पक्ष एकदिलाने काम करणार असतील तरच २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करता येईल, असे खरगेंनी जाहीर भाषणात सांगितले.

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
Voters in Malabar Hill insist on environment conservation in the wake of assembly elections 2024 mumbai print news
मलबार हिलमधील मतदार पर्यावरण संवर्धनासाठी आग्रही
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !

हेही वाचा : काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश

खरगेंच्या भाषणाचा रोख पश्चिम बंगाल, पंजाब आणि केरळ या राज्यांकडे होता. केरळमध्ये यावेळी तरी भाजपचे फारसे आव्हान काँग्रेस आघाडी व डाव्या आघाडीसमोर नसल्याने कदाचित ‘इंडिया’तील घटक पक्ष स्वतंत्र लढू शकतील. पण, पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये तरी काँग्रेसशी ‘आप’ व तृणमूल काँग्रेसने युती करायला हवी होती, असे खरगेंनी अप्रत्यक्षपणे सुचित केले.

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने काँग्रेसशी आघाडी करण्यास नकार दिला आणि परस्पर ४२ जागांवर उमेदवारही जाहीर केले. त्यामुळे इथे दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता संपुष्टात आली. असे असले तरी, रामलीला मैदानावरील सभेमध्ये तृणमूल काँग्रेस सहभागी झालेला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी आल्या नसल्या तरी पक्षाचे राज्यसभेतील गटनेते डेरेक ओब्रायन उपस्थित होते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसशी युती न करण्यावर भाष्य केले नाही पण, तृणमूल काँग्रेस हा ‘इंडिया’चा भाग असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. भाजपविरोधात लढण्यासाठी आम्ही ‘इंडिया’सोबत आहोत, असे ओब्रायन यांचे म्हणणे होते. वास्तविक, पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही एकटे पुरेसे आहोत, असे ममता बॅनर्जींचे म्हणणे होते.

हेही वाचा : उच्चशिक्षितांना पंतप्रधान मोदींची भुरळ? इकॉनॉमिस्टचा लेख

दिल्लीत आप आणि काँग्रेस एकत्र लढत असले तरी पंजाबमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत. पण, पंजाबमध्येही एकत्र लढण्याकडे काँग्रेसचा कल असावा असे दिसते. व्यासपीठावर बसलेले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना उद्देशून खरगेंनी ऐक्याचा मुद्दा उपस्थित केला होता. खरगेंच्या आधी मान यांचे भाषण झाले होते, त्यांच्या बोलण्यातील प्रमुख मुद्दा केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील ‘आप’ची लढाई हाच होता. त्यांनी पंजाबमधील ‘इंडिया’च्या ऐक्यापेक्षा भाजपने केलेल्या विरोधकांच्या गळचेपीवर भर दिला होता. ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या नेत्यांच्या भाषणांमध्ये संविधानापासून पक्षांच्या आर्थिक कोंडीपर्यंत अनेक विषय मांडले गेले असले तरी, खरगेंनी ‘इंडिया’तील ऐक्याला अधिक महत्त्व दिल्याचे त्यांच्या भाषणातून पाहायला मिळाले.

हेही वाचा : शिवराज पाटील यांच्या स्नुषेच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक आनंदी

महाराष्ट्र, तामीळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या पाच राज्यांमध्ये काँग्रेसने मित्र पक्षांशी आघाडी केली आहे. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये जागावाटप झालेले असून इथे काँग्रेसच्या वाट्याला कमीत कमी जागा आल्या आहेत. बिहारमध्ये एका जागेवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असली तरी, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नाराजीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सांगलीसारख्या मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात जागावाटपावरून मतभेद असले तरी दिल्लीत रामलीला मैदानावरील सभेत उद्धव ठाकरे सामील झालेले होते. ‘इंडिया’तील घटक पक्षांचे राज्यांमध्ये काँग्रेसशी सूर जुळत नसले तरी भाजपविरोधात मात्र राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसच्या शेजारी बसण्याची तयारी असल्याचे पहायला मिळाले.