परभणी : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघाच्या मोर्चेबांधणीसाठी भारतीय जनता पक्ष, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षानेही हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे गुरुवारी (दि.११) येथे येत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेविरोधात वरील तीन मित्रपक्षांपैकी कोणता पक्ष लढणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेने स्वतंत्रपणे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव हे उद्धव ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ आहेत. राज्यभर झालेल्या फाटाफुटीत परभणीत मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना अबाधित राहिली. या सेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादीचा अजित पवार गट, भारतीय जनता पक्ष यांचे प्रयत्न लोकसभेच्या अनुषंगाने चाललेलेच होते. आता त्यात एकनाथ शिंदे यांच्या सेनेचीही भर पडली आहे. भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नावांची चर्चा आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी राजेश विटेकर यांना मैदानात उतरवणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या गटानेही लोकसभेची मोर्चेबांधणी सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पक्षाची जिल्ह्यात फारशी ताकद नाही.
हेही वाचा : ठाकरे गटासमोर जागा राखण्याचे कडवे आव्हान तर भाजपनेही कंबर कसली
परभणी लोकसभेची जागा ‘बाळासाहेबांची शिवसेना’ धनुष्यबाण चिन्हावर लढवणार असे प्रतिपादन मराठवाडा संपर्क नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी) परभणीत केले. या पक्षाचे मराठवाडा संपर्क नेते तथा उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर तसेच शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. माजी मंत्री खोतकर म्हणाले, परभणी जिल्हा हा शिवसेनेचा, हिंदुत्वाचा, बालेकिल्ला आहे. १९८९ पासून या मतदारसंघातील जनतेने शिवसेनाप्रमुखांच्या विचारांवर, धनुष्यबाणावर प्रचंड प्रेम केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच सध्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहेत. ज्याअर्थी लोकसभेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री परभणी जिल्ह्याचा दौरा करत आहेत त्याअर्थी ही जागा शिवसेनाच धनुष्यबाण या चिन्हावर लढणार आहे हे निश्चित समजावे. येणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या सचिवांसह सर्व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा ? अपात्रतेवर या आठवड्यात निकाल
आगामी लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष आपल्या मित्रपक्षांच्या सोबत पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचा दावा पक्षाचे विभागीय संघटनमंत्री संजय कौडगे यांच्यासह अन्य नेते मंडळींनी याच दिवशी झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकीत व्यक्त केला. आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात मंगळवारी (दि. २) ग्रामीण जिल्हा कार्यकारणीची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, लोकसभा निवडणूक प्रमुख तथा ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, लोकसभा समन्वयक डॉ. सुभाष कदम आदींसह उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदुत्ववादास सातत्याने कौल देणार्या या मतदारसंघात आता भाजपानेच निवडणूक लढविली पाहिजे, असे विचार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी वरील तीनपैकी कुठल्यातरी एकाच राजकीय पक्षाला निवडणूक लढवावी लागेल. मात्र, हे तिन्ही मित्रपक्ष स्वतंत्रपणे कामाला लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा : फुटीनंतर निष्ठावानांना सक्रिय करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न, रोहित पवारांबद्दल मतभेद उघड
काँग्रेसचे माजी उपमहापौर शिंदे गटात
स्थानिक स्वराज्य संस्था व सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी उपमहापौर सय्यद समी उर्फ माजू लाला यांनी सहकारी माजी नगरसेवकांसह शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजुलाला यांनी आपल्या समर्थकांसह हा प्रवेश केला. सुरुवातीला शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या पाथरी येथील संपर्क कार्यालयात माजी उपमहापौर माजू लाला यांच्यासह त्यांचे सहकारी सदस्य भेटीस गेले होते. त्यावेळी सईद खान यांच्यासह शिवसेनेच्या नेतेमंडळींनी या सार्यांचे स्वागत केले. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना माजू लाला यांनी गेल्या १०-१५ वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींनी परभणी महानगराच्या विकासकामांचा अक्षरशः बट्याबोळ केल्याचा आरोप केला.