सुजित तांबडे

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असताना पुण्यात भाजपने उमेदवार निवडीच्यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. मात्र, पुण्यातील काँग्रेसमध्ये ‘सारे काही शांत शांत आहे’ गटबाजीची लागण झालेल्या काँग्रेसमध्ये उमेदवाराची सध्यातरी वानवा आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुण्यामध्ये सतत भेटी असल्या, तरी गटबाजी दूर करून मनोमीलन करणे त्यांनाही शक्य झाले नसल्याने सध्या पुण्यातील काँग्रेस मौनी बाबाच्या भूमिकेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या दीड वर्षात काँग्रेसला पूर्णवेळ शहराध्यक्षदेखील मिळू शकला नसल्याने नेतृत्वाअभावी काँग्रेस खिळखिळी झाली आहे.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
akola Congress MP Imran Pratapgarhi criticized corrupt Mahayuti government
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे महाभ्रष्ट सरकार, काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढी यांची खरमरीत टीका
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Navneet Rana on Uddhav Thackeray
Navneet Rana : “मी बाळासाहेबांची मुलगी…”, अमरावतीतील राड्याप्रकरणी नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर तोफ; म्हणाल्या…

लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने सर्वच पक्षांने हालचाली सुरू केल्या आहेत. पुण्यात भाजप सतत चर्चेत राहण्यासाठी नियोजनबद्ध प्रचार करत आहे. मात्र, काँग्रेसमध्ये एकमेकांची उणीधुणी काढण्यातच शक्ती वाया जात असल्याने असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा… मंत्र्यांच्या साक्षीवर शिंदे गटाची मदार, अधिवेशन काळातही सुनावणी

माजी मंत्री रमेश बागवे यांना शहराध्यक्ष पदावरून पायउतार करून प्रभारी शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांची नेमणूक करण्यात आल्याने गटबाजीला सुरुवात झाली. बागवे, माजी आमदार मोहन जोशी, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हा एक गट सक्रिय आहे, तर दुसरीकडे अरविंद शिंदे यांना मानणारा दुसरा गट आहे. दोन्ही गट हे वेगवेगळे कार्यक्रम आणि आंदोलनेही वेगवेगळी करत असतात. त्यामुळे काँग्रेमधील दुफळी वाढतच चालली आहे. आता लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू झाले अलले, तरी काँग्रेसमध्ये एकमेकांना लाथाळ्या मारण्यातच शक्ती पणाला लावली जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी उमेदवार कोण, याबाबत अद्याप कोणतीही चर्चा सुरू झाली नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा… मावळमध्ये अजितदादा पुत्र पार्थ पवारांसाठी जुळवाजुळव?

सध्या प्रत्येक गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून वेगवेगळी नावे पुढे केली जात आहेत. त्यामध्ये माजी आमदार मोहन जोशी यांचे नाव अग्रक्रमावर असून, शिंदे हेदेखील इच्छुक असल्याची चर्चा आहे. याशिवाय माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांचेही नाव चर्चेत आहे. ऐनवेळी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्याची खेळी खेळण्याच्या तयारीत काँग्रेस असल्याचे बोलले जात आहे. मात्र, कोणत्याही एकाली उमेदवारी दिली, तरी गटबाजी संपवून कलुषित झालेली मने एकत्र करण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे उभे राहिले आहे.

पूर्णवेळ शहराध्यक्ष मिळेना!

काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष म्हणून अरविंद शिंदे गेल्या दीड वर्षापासून काम पहात आहेत. मात्र, त्यांना बागवे, जोशी गटाची साथ एकदाही मिळालेली नाही. पूर्णवेळ शहराध्यक्ष कोणालाही केला, तरी एक गट नाराज होणार असल्याने पक्षश्रेष्ठीही कोणाला नाराज करण्याच्या मनस्थितीत नसल्याने प्रभारी शहराध्यक्ष ठेवण्यात आला आहे. आता आगामी निवडणुकांच्या तोंडावर कोणालाही दुखावण्याच्या स्थितीत ज्येष्ठ नेते नसल्याने पुण्यातील काँग्रेसला पूर्णवेळ शहराध्यक्ष मिळण्याची शक्यता धूसर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.