पुणे : गटबाजीने पोखलेल्या पुणे काँग्रेसमध्ये लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येक गटाकडून स्वयंघोषित उमेदवार जाहीर होऊ लागले असताना आता राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे हेदेखील उमेदवारीच्या रिंगणात उतरले असल्याने काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. आतापर्यंत माजी आमदार मोहन जोशी, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची नावे चर्चेत असताना बागवे यांनीही लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली असल्याने उमेदवारीची चौकट तोडायची कशी, हे कठीण आव्हान काँग्रेसपुढे उभे राहिले आहे.

पुण्यातील काँग्रेस दुभंगली असून, त्यास कारणीभूत शहराध्यक्षपद ठरले आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी एका पदावर असलेल्यांनी पदे रिक्त करण्याचा कॉंग्रेसने ठराव केला. त्यानुसार बागवे यांनी राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बागवे यांच्या जागी अरविंद शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी दिली. मात्र, शिंदे यांना हे पद दिल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली. त्यामुळे शिंदे यांची प्रभारी शहराध्यक्ष म्हणूनच नेमणूक कायम ठेवण्यात आली आहे. बागवे यांच्याकडे हे पद असेपर्यंत गटबाजी उघडपणे दिसून आली नव्हती. मात्र, शिंदे यांची या पदावर वर्णी लागल्यानंतर गटबाजीला उधाण आले. माजी आमदार मोहन जोशी, धंगेकर, बागवे यांचा गट स्वतंत्रपणे कार्यक्रम घेत राहिला आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी जोशी, धंगेकर आणि शिंदे यांची नावे चर्चेत होती. आता बागवे यांनीही लढण्याची तयारी दर्शविली असल्याने काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे.

Chandrakant Khaire On Shiv Sena Shinde group
Chandrakant Khaire : ‘शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपाल पदाची ऑफर’, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Uday Samant on Eknath Shinde
Sanjay Raut: “एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांना नकोसे, लवकरच मोदींना…”, संजय राऊत यांचा दावा
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patil : “सवय बदला, अन्यथा मोजून आठवड्याच्या आत…”, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा
Ajit Pawar
Ajit Pawar : “येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा…”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शिर्डीत महत्वाचं विधान

हेही वाचा : अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढविण्याची तयारी बागवे यांनी दर्शविली असल्याने आता काँग्रेसमधील इच्छुकांच्या यादीत आणखी एक भर पडली आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत निमार्ण झालेली ‘चौकट’ कशी तोडायची, हे आव्हान काँग्रेसपुढे उभे राहिले आहे. बागवे यांचा निवडणुकीचा अनुभव दांडगा आहे. २००४ मध्ये ते पहिल्यांदा पर्वती विधानसभा मतदार संघातून निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये ते पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातून विजयी झाले होते. तत्पूर्वी त्यांनी पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक आणि सभागृहनेते म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. काँग्रेसचे शहराध्यक्षपद त्यांच्याकडे सुमारे सहा वर्षे होते. या अनुभवाच्या जोरावर खासदारकीची निवडणूक लढविण्याची तयारी बागवे यांनी सुरू केली आहे.

आबा बागुलांच्या पत्राने पक्षात अस्वस्थता

काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवून लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा तेच ‘यशस्वी कलाकार’ दिल्यास निवडणुकीचा निकालही यशस्वीच लागेल, असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे जनमताचा कौल लक्षात घेऊन उमेदवाराची निवड करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या पत्रानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा : पडझडीनंतर मराठवाड्यातील काँग्रेसमध्ये सामसूमच!

२० जण इच्छुक

काँग्रेसने जानेवारी महिन्यात इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. त्यामध्ये २० जणांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामध्ये जोशी, धंगेकर यांच्यासह ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

पक्षाने आदेश दिल्यास पुणे लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार आहे. पक्षाच्या माध्यमातून सातत्याने लोकांशी संपर्कात असतो. त्याआधारे निवडणूक लढवून विजय मिळवू शकतो.

रमेश बागवे, माजी गृहराज्यमंत्री

Story img Loader