प्रथमेश गोडबोले

पुणे : मुंबईनंतर महत्त्वाचे आणि विधानसभेचे तब्बल २१ विधानसभा मतदारसंघ असलेल्या पुणे जिल्ह्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय डाव-प्रतिडाव टाकण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे सत्तेवर होते, या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या आमदारांना भरीव निधी देऊन विकासकामे मार्गी लावली. त्यानंतर झालेल्या सत्तांतरामुळे शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदारांनी उचल खाल्ली आहे. पुरंदरमध्ये माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी तालुक्यात विविध विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजन यांचा धडाका लावला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार संजय जगताप आणि शिवतारे यांच्या खडाजंगी होत आहे. दुसरीकडे इंदापूर तालुक्यात माजी मंत्री, आमदार हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचे पक्ष एकत्रित सत्तेवर असल्याने जुळवून घेत असल्याचे चित्र असून नुकत्याच झालेल्या जाहीर कार्यक्रमात दोघेही एकमेकांच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसल्याचे दिसले.

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Chembur Marwari Chawl, citizens vote vidhan sabha boycott, vote boycott, rehabilitation,
मुंबई : दीड हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
review of the development works was presented in the campaign of the candidate in Byculla Mumbai news
भायखळ्यातील प्रचारात विकासकामांचा लेखाजोखा

पुरंदरच्या विकासकामात गतिरोधक होण्यापलीकडे माजी राज्यमंत्र्यांची काही मदत नाही. योगदान नसलेली आणि स्वत: न केलेली कामे मी केली असे सांगण्याचा अट्टाहास करण्यासही ते कमी पडत नाहीत. अवास्तव हक्क दाखविण्यापेक्षा काहीतरी काम करा, श्रेयवादाचे राजकारण करू नका आणि येणारी विकासकामे थांबवू नका, , अशा शब्दांत पुरंदर विद्यमान आमदार संजय जगताप यांनी शिवतारे यांच्यावर टीका केली. पुरंदरमध्ये माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री असलेले विजय शिवतारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून विकासकामांची भूमिपूजन, उद्घाटने यांचा झपाटा लावण्यात आला आहे. शिवतारे यांनी फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून घेतला. तसेच सातत्याने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बैठका घेऊन पुरंदरमधील विकासकामांबाबत पाठपुरावा करत आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेऊन शिवतारे यांनी तयारी देखील सुरू केली आहे. याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर पवारांचा शिवतारे यांच्याबद्दलचा विरोध मावळला आहे. त्यामुळे शिवतारे भरात आहेत. त्यामुळे जगताप-शिवतारे यांच्यातील संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… लाभार्थीचा वापर करून रावसाहेब दानवे यांची मतपेरणी

हेही वाचा… हिंगोलीतील जातीय समीकरणातूनच राधेश्याम मोपलवारांचे नाव चर्चत

दरम्यान, इंदापूर येथे श्रीबाबीर देवस्थान मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे एकाच व्यासपीठावर शेजारी बसले होते. हर्षवर्धन पाटील यांचे दिल्लीत चांगले संबंध आणि वजन आहे, तर भरणे यांनी मागणी करताच अजित पवार हे त्यांच्या फाइलवर लगेच स्वाक्षरी करतात. विकासकामांसाठी राजकारण बाजूला ठेवण्याची भूमिका या दोन्ही स्थानिक नेत्यांनी मांडल्याने पुरंदरमध्ये आजी-माजी आमदारांत खडाजंगी, तर इंदापूरात याविरुद्ध चित्र पाहायला मिळत आहे.