संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील देवधर पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आतूर होते पण, स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने न दिलेली साथ या दोन्ही कारणांमुळे देवधरांना डावलले गेल्याचे मानले जात आहे. देवधरांनी काही महिन्यांपासून दिल्लीतील मुक्काम पुण्यात हलवला होता, तिथे त्यांनी निवडणूक कार्यालय सुरू केले होते. त्यांच्या ‘माय होम इंडिया’ या ‘एनजीओ’च्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात होते. देवधरांनी संघाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हिरवा कंदील दिल्याशिवाय देवधरांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली नसती असे सांगितले जात होते. पण, ऐनवेळी सुनील देवधरांऐवजी पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर केली गेली. त्यामुळे देवधरांची अवस्था ना केंद्रात ना राज्यात अशी अधांतरी झाली आहे.

पुण्यातून आपण लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या देवधरांनी पेरल्या तेव्हा मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सुरूही झाली होती. मोहोळ महापौर होते, स्थायी समितीचे अध्यक्ष होते, आता त्यांना प्रदेश कार्यकारिणीमध्ये सरचिटणीस केलेले आहे. पुण्याच्या राजकारणावर त्यांची पकड होती, पुणेकर मोहोळांना ओळखतात. कोथरूड हेच मोहोळांचे कार्यक्षेत्र राहिले आहे. देवधर स्पर्धेत उतरल्याचे लक्षात येताच मोहोळांनी दिल्लीवाऱ्या वाढवल्या होत्या. ते केंद्रातील भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होते. राज्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यामुळे मुरलीधर मोहळांचे पारडे भारी होते.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
north nagpur
ध्रुवीकरणाशिवाय उत्तर नागपुरात भाजपला यश मिळवणे अशक्य? मतविभाजन काँग्रेसला रोखणार का?
Tarabai Mahadev Kale
सर्वात कमी उंचीची उमेदवार… उंची जेमतेम ३ फुट ४ इंच, मात्र तब्बल सात निवडणुका…
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?

हेही वाचा : पंकजा मुंडे राजकीय वनवासातून बाहेर !

देवधरांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय तहान लागल्यावर विहिर खणण्याचा प्रकार होता असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे होते. देवधर यांनी प्रदेश भाजपच्या नेत्यांशी संपर्क ठेवलेला नव्हता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही त्यांच्या गाठीभेटी फारशा झालेल्या नव्हत्या. लोकसभेसाठी तयारी सुरू केली तेव्हा देखील देवधरांनी पुण्यातील भाजपच्या कार्यालयाला भेट दिली नसल्याचे सांगतात. देवधरांची उठबस भाजपच्या नेत्यांपेक्षा संघातील कार्यकर्त्यांमध्ये अधिक होती. देवधरांचे काम संघामध्ये वा त्यांच्या ‘एनजीओ’शी निगडीत असल्यामुळे त्यांचा भाजपशी संपर्कात तुलनेत कमी होता. भाजपचे नेते वा कार्यकर्ते देवधरांना पुरेसे ओळखत नसल्यामुळे लोकसभेसाठी भाजप त्यांना मदत करेल अशी अपेक्षाही बाळगणेही चुकीचे ठरले असते असेही बोलले जाते. देवधर भाजपपेक्षा ‘एनजीओ’च्या कामात अधिक सक्रिय असतात, ही भाजप नेत्यांची प्रतिक्रिया बोलकी ठरते.

हेही वाचा : चंद्रपूर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर वाद शिगेला

पुण्यात ब्राह्मण उमेदवार दिला तरच भाजप लोकसभेची निवडणूक जिंकेल असे बोलले जात होते. त्याआधारावर देवधरांना उमेदवारी मिळू शकते असेही मानले जात होते. त्यामुळे देवधरांनाही भाजपचे केंद्रीय नेतृत्व आपल्याला उमेदवारी देईल असा विश्वास वाटत होता. मात्र, कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली, त्या बिनविरोध निवडूनही आल्या. आता पुण्यातून एकाचवेळी दोन ब्राह्मण उमेदवार कशासाठी द्यायचे असाही प्रश्न भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासमोर उभा राहिला होता. शिवाय, देवधरांना उमेदवारी देणे काँग्रेसच्या पथ्यावर पडले असते असे मानले जाते. देवधरांना उमेदवारी मिळण्याची आस देवधरांपेक्षाही काँग्रेसला अधिक होती. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने काँग्रेसचे हे मनसुबे उधळून लावले. कसब्यामध्ये महाविकास आघाडीने विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना जातीची गणिते मांडून निवडून आणले. हेच सूत्र लोकसभा निवडणुकीत देवधरांविरोधात वापरता आले असते. पण, आता मुरलीधर मोहोळ यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसची गणिते मोडून पडली आहेत. भाजपने मोहोळ यांना उभे करून ब्राह्मणेतर (मराठा) उमेदवार मैदानात उतरवला असून काँग्रेसकडे सक्षम ब्राह्मण उमेदवार नाही. पुण्यात फक्त ब्राह्मण उमेदवार देण्याचा निकष दोन्ही पक्षांना उपयोगी पडणार नाही. त्यामुळे देवधरांना उमेदवारी नाकारून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एका दगडामध्ये दोन पक्षी मारल्याचे मानले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे देवधरांशी फारसे सख्य नसल्याचे बोलले जात होते. आता देवधरांना संघामध्येच सक्रिय राहावे लागेल वा भाजपमध्ये नव्याने सक्रिय व्हावे लागेल, असे मानले जात आहे.