संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील देवधर पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आतूर होते पण, स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने न दिलेली साथ या दोन्ही कारणांमुळे देवधरांना डावलले गेल्याचे मानले जात आहे. देवधरांनी काही महिन्यांपासून दिल्लीतील मुक्काम पुण्यात हलवला होता, तिथे त्यांनी निवडणूक कार्यालय सुरू केले होते. त्यांच्या ‘माय होम इंडिया’ या ‘एनजीओ’च्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात होते. देवधरांनी संघाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हिरवा कंदील दिल्याशिवाय देवधरांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली नसती असे सांगितले जात होते. पण, ऐनवेळी सुनील देवधरांऐवजी पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर केली गेली. त्यामुळे देवधरांची अवस्था ना केंद्रात ना राज्यात अशी अधांतरी झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा