हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे मैदान मारण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सध्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा सपाटा चालवला आहे.या स्पर्धांच्या माध्यमातून चकाकते भव्य चषक आणि हजारो रुपयांची बक्षिसे वाटून ही नेतेमंडळी या निवडणुकांसाठी पावसाळ्याच्या तोंडावर जणू मतांची बेगमीच करत आहेत. जिल्ह्यातील १० नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या येत्या काही महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकेकाळी उरुस किंवा जत्रांचे निमित्त साधून ही नेतेमंडळी मतदार राजाशी सलगी करण्याचा प्रयत्न करत असत. या धार्मिक – सांस्कृतिक उपक्रमांची जागा आता क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल यासारख्या क्रीडा स्पर्धांनी घेतली आहे.

क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धांचे आयोजन

गावागावात क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धांचे आयोजन सुरु झाले आहे. अलिबाग, पेण, रोहा, श्रीवर्धन येथे अशा स्पर्धांची चलती आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हे या स्पर्धांचे वैशिष्ट्य ठरत आहे. शेकापचे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी झिराड येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांसाठी भले मोठे क्रिडांगण, प्रेक्षक गॅलर उभारण्यात आली होती. स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे. तसेच पंचांना रिव्ह्यू घेण्याची सुविधा जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली होती.

अलिबागमध्ये नगराध्यक्ष प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या वतीने फुटबॉल आणि क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना हजारो रुपयांची बक्षिसे आणि भलेमोठे चषक  वाटण्यात आले. शेकापने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केल्यानंतर काँग्रेसनेही मधुकर ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले. या स्पर्धांना अलिबागकरांचा उदंड प्रतिसादही मिळाला.

रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांनी आमदार चषक क्रिकेट स्पर्धा भरविल्या, महत्वाची बाब म्हणजे स्पर्धा भरवून ते थांबले नाहीत तर चक्क एका टिममधून ते खेळाडू म्हणून सहभागी झाले. मैदानात उतरून आपल्या खेळाची चुणूक दाखवली. या स्पर्धेचे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले.जिल्ह्यात सहा नगर पंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे, तर नगर परिषदांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.  जिल्हा परिषदेचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपला आहे. त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचीही चाहूल लागली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मतांची बेगमी करण्यासाठी या स्पर्धांमधून बक्षिसांची साखर पेरणी सुरु करण्यात आली आहे.

महिलांसाठी सेलिब्रिटींसमवेत हळदी कुंकू

दरम्यान महिला मतदारांनाही आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ‘सेलिब्रिटींसह हळदी कुंकू’ समारंभांना आयोजित केले. पेण, रोहा, माणगाव, श्रीवर्धन आणि मुरुड येथे सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हळदीकुंकू समारंभ पार पडले. भाजप आणि शेकापनेही अशाच हळदी कुंकू समारंभांचे आयोजन करून आपल्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. भाजपने अलिबाग, मरूड येथे तर शेकापने अलिबाग, खालापूर आणि गोरेगाव येथे असे हळदीकुंकू समारंभ आयोजित केले होते.