राजस्थानमधील काँग्रेस पक्षांतर्गत घमासान थांबण्याचा नाव घेत नाही आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील दीर्घकाळ चाललेले मतभेद पुन्हा एकदा चवाट्यावर येताना दिसत आहेत. याला कारणीभूत ठरली आहे पक्षाच्या युवा शाखेत गेहलोतच्या निष्ठावंतांच्या नातेवाईकांच्या नियुक्ती

४ सप्टेंबर रोजी राजस्थान युवक काँग्रेस (आर वाय सी) प्रभारी हरपालसिंह चुडास्मा यांनी वरिष्ठ उपाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष आणि संघटनेचे सरचिटणीस या पदांवर नियुक्ती जाहीर केल्यानंतर वाद सुरू झाला. वरिष्ठ उपाध्यक्षपदी राज्याचे माजी आरोग्य मंत्री रघु शर्मा यांचा मुलगा सागर आणि कॅबिनेट मंत्री प्रताप सिंह खचरियावास यांचे पुतणे दुष्यंत राज सिंह यांचा समावेश करण्यात आले.सध्या गुजरातमधील काँग्रेसच्या कारभाराचे प्रभारी असलेले रघु शर्मा आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री खाचरियावास हे दोघेही गेहलोत यांच्या जवळचे आहेत. खाचरियावास पूर्वी पायलट कॅम्पमध्ये होते परंतु २०२० च्या राजकीय संकटाच्या वेळी त्यांनी अशोक गहलोत यांना समर्थन केले.

राजस्थान युवा मंडळाचे अध्यक्ष  सीताराम लांबा यांनी नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लांबा यांनी ट्विट करत, “युथ काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाही शिल्लक आहे का? जे आयवायसीचे सदस्यही नाहीत त्यांना संघटनात्मक निवडणुका न घेता वरिष्ठ उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे.” या विषयावर त्यांनी आयवायसीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांना पत्र लिहिले.

 लांबा यांच्या मते “युवक काँग्रेसमधील नियुक्त्यांची एक विशिष्ट प्रक्रिया असते त्याकडे दुर्लक्ष केले तर ते कार्यकर्त्यांसाठी चांगले नाही.” “नियुक्त्या एकतर निवडणुकांद्वारे किंवा संस्थेमध्ये सतत काम केल्यानंतर, एखादी व्यक्ती लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यात कोणत्याही तरुणाचे योगदान म्हणून केली जाते. नुकत्याच झालेल्या पदोन्नती आणि नियुक्तींमध्ये योग्य प्रक्रिया पाळली गेली नाही.”

लांबा यांच्या आक्षेपांवर दुष्यंत राज सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, “मी गेल्या पाच वर्षांपासून युवक काँग्रेसचा सदस्य आहे आणि सुमारे दोन वर्षांपासून मी सरचिटणीस आणि अलवर जिल्ह्याचा प्रभारी आहे. मी राजस्थान युवक काँग्रेससाठी कठोर परिश्रम घेतले. आणि रस्त्यावरील निदर्शने आणि धरणे यात सहभागी झालो आहे. आता, मी केलेल्या सर्व कामांसाठी मला बढती मिळाली आहे. ज्यांचा संघर्ष किंवा चळवळीशी काहीही संबंध नाही ते नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत अशा लोकांकडून स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न आहे.

Story img Loader