सतीश कामत

माजी मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी दौऱ्यात हजेरी लावलेले कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपिन बंदरकर व महिला संघटक कांचन नागवेकर यांना या पदांवरून हटवत शिवसेनेने नव्याने पक्षबांधणी सुरू केली आहे. मात्र, म्हाप यांच्या जागेवर  उपजिल्हाप्रमुखपदी निवड झालेले प्रकाश रसाळ‌ यांनी तब्येतीच्या कारणास्तव पद स्वीकारत नसल्याचे पत्र जिल्हाप्रमुखांना पाठवत पक्षनेतृत्वाला धक्का दिला आहे.

bjp leader vinod tawde reply to sharad pawar for targeting amit shah
अमित शहा देशभक्तीच्या प्रकरणात तडीपार; विनोद तावडे यांचे शरद पवार यांना प्रत्युत्तर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Chandrashekhar Bawankule gave hints about confusion over allocation of guardian ministers will end in two days
पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Income Tax raid on BJP MLA Harvansh Singh Rathore
भाजपाच्या माजी आमदाराच्या घरात आढळल्या मगरी; भ्रष्टाचार प्रकरणात प्राप्तीकर विभागाने धाड टाकताच अधिकारीही चक्रावले
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

हेही वाचा- ‘एका’चतुर्वेदींनी काँग्रेस बुडवली, ‘दुसरा’सेना संपवणार?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सहभागी झालेले आमदार उदय सामंत या सर्व राजकीय घडामोडींनंतर शुक्रवारी प्रथमच रत्नागिरीत आले. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेतील समर्थकांनी सकाळी पाली येथील निवासस्थानी आणि त्यानंतर रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहातही गर्दी केली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश होता. 

हेही वाचा- राष्ट्रपतीपदासाठी उद्या मतदान, संसदेचे पावसाळी अधिवेशनही सुरू होणार

या दौर्‍यानंतर शिवसेनेकडून सामंत समर्थकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. स्वागताला हजर असलेल्यांपैकी म्हाप, बंदरकर आणि नागवेकर यांना रविवारी पदांवरून हटवत शिवसेनेकडून नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. त्यांच्या जागी शहरप्रमुख म्हणून प्रशांत साळुंखे, उपजिल्हा प्रमुख म्हणून प्रकाश रसाळ आणि महिला संघटक म्हणून साक्षी रावणंग यांची निवड केल्याचेही जाहीर करण्यात आले. ही कारवाई अपेक्षितच होती. यासंदर्भातील हालचाली दौर्‍यानंतर लगेचच सुरू झाल्या होत्या. नवीन नियुक्तीसंदर्भात स्थानिक जुन्या शिवसैनिकांशी सल्लामसलतही झाली होती. रत्नागिरीतील इच्छुकांच्या नावांवर चर्चा झाल्यानंतर अंतिम नावे वरिष्ठांकडे कळविण्यात आली होती. पण त्यापैकी उपजिल्हाप्रमुखपदी निवड झालेल्या रसाळ यांनी एका पत्राद्वारे पदावर काम करण्यास असमर्थता व्यक्त केली. तसा निरोपही जिल्हाप्रमुखांना पाठवला. सकाळी नियुक्ती जाहीर झाल्यानंतर काही तासांतच नियुक्ती नाकारल्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.

Story img Loader