Delhi Assembly Election Result: ईशान्य दिल्लीतील चार मतदारसंघापैकी तीन मतदारसंघात भाजपाने विजय मिळविला आहे. ईशान्य दिल्लीत २०२० साली मोठी दंगल उसळली होती. त्यामुळे याठिकाणी काय निकाल लागलणार, याची अनेकांना उत्सुकता लागली होती. विशेष करुन मुस्तफाबाद आणि करावल नगर येथे भाजपाला मोठा विजय मिळाला आहे. मुस्तफाबादमध्ये पाच टर्म आमदर असलेल्या मोहन सिंह बिष्ट यांनी ८५,२१५ मते घेतली असून १७,५७८ मताधिक्य मिळवले आहे. तर करावल नगर येथे भाजपा उमेदवार यांनी १,०७,३६७ एवढी मते घेतली असून २३,२५५ एवढे मताधिक्य घेत विजय मिळविला आहे.
२३ फेब्रुवारी २०२० रोजी जाफराबाद येथे नागरिकत्व (सुधारणा) कायद्याच्या विरोधात आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांना मिश्रा यांनी धमकी दिली होती. त्यांच्या चिथावणीखोर भाषणानंतर ईशान्य दिल्लीत दंगल उसळली. ज्यामुळे नागरिकत्व (सुधारणा) कायद्याच्या विरोधातील आणि समर्थनार्थ असलेल्या लोकांमध्ये दंगल उसळली. ज्यामध्ये ५३ लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक मृत्यूमुखी पडले.
प्रचाराची रणनीती यशस्वी
भाजपाने विधानसभेच्या संपूर्ण प्रचारादरम्यान दंगलीचा उल्लेख केला नाही. प्रचाराच्या शेवटच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फक्त एका ओळीचा दिल्लीतील दंगलीचा उल्लेक केला. “आप”ला लक्ष्य करताना अमित शाह म्हणाले, २०२० रोजी दिल्लीतील दंगलीला आम आदमी पक्ष जबाबदार होता. त्यांच्यामुळे राजधानीत हिंसाचार उसळला. अमित शाह पुढे म्हणाले, दिल्लीमध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाल्यास दिल्लीतील सर्व रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना हुसकावून लावले जाईल.
आम आदमी पक्षाच्या सरकारला ‘आप’दा सरकार अशी उपमा देऊन अमित शाह यांनी ईशान्य दिल्लीतील प्राचीन शिव मंदिर आणि हनुमान मंदिराला भेट दिली यानंतर त्यांनी जाहीर सभांमधून दारू माफियांपासून दिल्लीला मुक्त करण्याचे आवाहन केले. तसेच मुस्लीमबहुल भागात २०२० च्या हिंसाचारानंतर दंगलीशी संबंध असल्याचा आरोप ठेवत आम आदमी पक्षाचे माजी नेते ताहिर हुसेन यांना अटक झाली. त्यामुळे ‘आप’ने त्यांची हकालपट्टी केली. यावेळी ताहिर हुसेन हे एमआयएम पक्षाच्या तिकीटावर निवडणुकीसाठी उभे होत.
बिष्ट आणि मिश्रा यांच्या व्यतिरिक्त विद्यमान आमदार अजय महावार यांचाही घोंडा यांना मतदारसंघात २६ हजार मताधिक्य मिळाले आहे. ईशान्य दिल्लीतील फक्त सीलमपूर येथून भाजपाला पराभवाचा सामना करावा लागत आहे. सीलमपूर येथे ‘आप’चे उमेदवार झुबैर चौधरी यांनी विजय मिळविला आहे. झुबैर चौधरी यांना ७९,००९ मते मिळाली असून ४२,४७७ एवढ्या मताधिक्यानी त्यांनी अनिल शर्मा यांच्याविरोधात विजय मिळविला.