सांगली : हातकणंगले लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमधून उमेदवारीचा आग्रह धरला जात असून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहूल महाडिक, इस्लामपूरचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे समन्वयक सत्यजित देशमुख यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीमध्ये हातकणंगलेचे प्रतिनिधीत्व सध्या शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्याकडे असून त्यांनीही आपला दावा पुढे रेटला असून त्यांची तयारीही सुरू आहे, तर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून निवडणुक रिंगणात उतरणार हे स्पष्ट असले तरी इंडिया की अपक्ष हे अद्याप अनिश्चित असतानाच आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांच्यासाठीही राष्ट्रवादीही आग्रही झाली आहे.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
Mallikarjun Kharge criticize BJP in nagpur
“बाटना और काटना हे भाजपचे काम” मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत

हेही वाचा : भव्यदिव्य कार्यक्रमांच्या आयोजनातून सुधीर मुनगंटीवार यांची मतपेरणी

हातकणंगले मतदार संघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, शाहूवाडी-पन्हाळा हे विधानसभा मतदार संघ तर सांगलीतील शिराळा आणि वाळवा या दोन मतदार संघाचा समावेश आहे. लोकसभा मतदार संघ पुनर्रचना होईपर्यंत हे दोन मतदार संघ कराडमध्ये समाविष्ट होते. आता कोल्हापूर जिल्ह्याची सलग्नता ठेवून हातकणंगले मतदार संघात सहभागी झाले आहेत. या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी केले होते. त्यासाठी त्यांना एकवेळ भाजपची मिळाली होती. मात्र, राष्ट्रवादीची सोबत करताच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या मतदार संघाचे अर्थकारणच मुळात उस शेतीवर अवलंबून असल्याने शेट्टी यांनी पुन्हा एकदा उसदरावरून आंदोलन करून मतदार संघात जागृती करण्याचा प्रयत्न केला. कृष्णा, वारणा, पंचगंगा या तीन नद्यांच्या खोर्यात उसशेतीवर राजकारण पिकविण्याचा आणि घडविण्याचा इतिहास आतापर्यंत दिसून आला आहे.

यावेळी राजकीय स्थिती वेगळी आहे, कालपरवापर्यंत आपला एकला चलोचा झेंडा खांद्यावर घेउन शेट्टी मैदानात उतरण्याच्या तयारीत होते. आता मात्र, त्यांच्या नावाची इंडिया आघाडीतच चर्चा सुरू झाली असून त्यांच्यासाठी काँग्रेसच्या कोट्यातून जागा देण्याचा निर्णय घेतला जाण्याची शययता आहे. यामुळे महाविकास आघाडीचे ते पुरस्कृत उमेदवार ठरतील. यामुळे राष्ट्रवादीचे आमदार पुत्र प्रतिक पाटील यांना मैदानात उतरण्यापुर्वीच माघार घेण्याची वेळ येण्याची शययता असल्याने राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता दिसत आहे.

हेही वाचा : रामटेकवर भाजपचा डोळा असल्याने शिंदे गटात अस्वस्थता

लोकसभा उमेदवारीवरून निर्माण होणाऱ्या नाराजीचा फायदा घेण्याची मानसिकता भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. यातूनच देशमुख, महाडिक आ णि भोसले-पाटील यांच्या नावाची चर्चा भाजपमध्ये सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात भाजपची कार्यकारिणीची बैठकही याच पार्श्वभूमीवर इस्लामपूरात झाली. कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसभा उमेदवारीबाबत आग्रह झालेला नसला तरी पडद्याआड हालचाली गतीमान झाल्या आहेत. उमेदवारीवर दावा सांगणाऱ्यांमध्ये महाडिक यांना कोल्हापूरमधील संबंधाचा फायदा मिळेल असे वाटते. तर प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा, वीज कामगार संघटनेच्या माध्यमातून निर्माण झालेले स्नेह संबंध यामुळे भोसले-पाटील यांचा दावाही प्रबळ ठरू शकतो. तर देशमुख हे आमदार पाटील यांचे साडू आहेत. यामुळे त्यांची भिस्त हे पै-पाहुण्यांच्या मर्जीवरच राहण्याची शययता नाकारता येत नाही.

हेही वाचा : Uma Bharti: “मी अयोध्येत भाषणाला उभी राहिले आणि समोर बाबरी मशिदीवर…”, उमा भारतींनी सांगितला ६ डिसेंबर १९९२ चा तो प्रसंग!

मुळात हातकणंगलेची जागा महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार हे अस्पष्ट आहे. शिवसेना शिंदे गटाचा दावा प्रबळच राहणार आहे. कारण सध्या त्यांच्याकडेच प्रतिनिधीत्व आहे. मात्र, प्रस्थापिताविरूध्द असलेल्या नाराजीचा फटकाही बसू शकतो. शिवसेनेत फूट पडल्यामुळे ठाकरे गटाची भूमिका निश्चितच माने यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. याशिवाय या मतदार संघात आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती हा पक्षही महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यांची भूमिका शिवसेना शिेंदे गटापेक्षा भाजपला अनुकूलच राहणार आहे.

आमदार पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांचा राजकीय प्रवेश तडजोडीच्या राजकारणामुळे अडचणीत येतो की काय अशी शक्यता सध्या तरी दिसत आहे. त्यांच्यासाठी नमनालाच आघाडीच्या राजकारणाचा फटका बसला तर पुन्हा किमान पाच वर्षे प्रतिक्षाच करावी लागणार आहे. मुळात या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व माने घराण्यातील स्व. बाळासाहेब माने, निवेदिता माने यांनी केलेले आहे. शेट्टी यांनी हा मतदार संघ माने यांच्याकडून काढून घेतला. तर आवाडे गटाची ताकदही या मतदार संघात दुर्लक्षित करता येणार नाही. या तडजोडीच्या राजकारणात भाजपच्या मंडळींनी उमेदवारीसाठी आग्रह धरल्याने निवडणुकीपुर्वीच राजकीय रंगत वाढली आहे.