सांगली : लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास अद्याप वेळ असताना त्यानंतर होणार्या विधानसभेसाठी जत विधानसभा मतदार संघात नेतेमंडळींनी मशागत सुरू केली आहे. विशेषत: भाजपमध्ये उमेदवारीसाठीची आतापासूनच चुरस लागलेली असताना भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी माडग्याळ कालव्यातील म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा पूजन करीत असताना या योजनेचे श्रेय सर्वच राजकीय नेत्यांचे असल्याचे सांगत मतभेदांची दरी सांधण्याचा प्रयत्न चालविला आहे. काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना सोबत घेउन न बोलावता माजी आमदार विलासराव जगताप यांच्या घरी चहापाण्यासाठी जाउन दिलजमाई झाल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात यामध्ये फारसे तथ्य सध्या तरी दिसत नाही. तर दुसर्या बाजूला जतसाठी २५ कोटींचा निधी आणल्याचे भांडवल करून आमदार पडळकर यांची मतदार संघात साखरपेरणी सुरू असली तरी उपरा आणि स्थानिक असा वाद धुमसू लागला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा