सांगली : भाजपचे ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर होईल, अशी अपेक्षा असताना जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रमुखांची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाचा पर्यायी चेहरा कोणता असेल याचे स्पष्ट संकेत पक्षाने दिले आहेत.

सांगली जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातून एक खासदार निवडला जातो. तर वाळवा आणि शिराळा या दोन मतदारसंघाचा समावेश हातकणंगले लोकसभा मतदारसंघात करण्यात आला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी एकेकाळचे भाजपचे उमेदवार दीपक शिंदे यांना निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षात फंदफितुरी टाळण्यासाठी शिंदे यांचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न भाजपचा असला तरी यदाकदाचित भाजपला भाकरी फिरवण्याचा प्रसंग आला तरच पर्यायी उमेदवार म्हणून या निवडणूक प्रमुखांकडे पाहिले जाते. मुळात लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्याबाबत असलेली नाराजी वेळोवेळी स्पष्ट झाली असून, पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे खासदारकीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. जर दोघांमध्ये समेट झाला तरच संजयकाकांची हॅटट्रिक होऊ शकेल याची जाणीव पक्षाला आहे. मात्र, जर दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील तर पक्षाचा पर्यायी चेहरा म्हणून निवडणूक प्रमुखांना पुढे केले जाऊ शकते.

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray regarding minority votes print politics news
अल्पसंख्याकांच्या मतांसाठी ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणणे बंद; देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
In Thane district Shiv Sena s rebels are giving Mahayuti a headache print politics news
ठाणे जिल्ह्यात महायुतीला शिवसेनेच्या बंडखोरांचा ताप; डोंबिवली, ऐरोली,…
The decision to reject the election candidature application is correct The Commission's claim in the High Court the petition was rejected
निवडणूक उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निर्णय योग्यच; आयोगाचा उच्च न्यायालयात दावा, याचिका फेटाळली
महायुतीतील बंडखोरांवर कारवाईची केवळ घोषणाच! भाजपकडूनही हकालपट्टीचा निर्णय प्रलंबित
Worli Assembly Constituency Assembly Elections by Major Parties Not a candidate print politics news
प्रमुख पक्षांकडून ‘वरळी’कर उमेदवारच नाही
Uddhav Thackeray criticizes Narendra Modi amit Shah print politics news
‘मोदी, शहांच्या पालख्या वाहणारा राज्याचा शत्रू’
Rashmi Shukla Election Commission appointment government print politics news
रश्मी शुक्ला यांचे भवितव्य नव्या सरकारच्या हाथी
Sharad Pawar appeal to give a chance to the new generation print politics news
संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत; नव्या पिढीला संधी देण्याचे शरद पवार यांचे आवाहन
Loksatta aptibar Raj Thackeray avoided meeting candidate Sada Saravankar
आपटीबार: सुसंगती ‘सदा’ घडो!

हेही वाचा – संजीव नाईकांचा स्वप्न भंग ?

हातकणंगले मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे. यामुळे या मतदारसंघात किमान सध्या तरी उमेदवाराबाबत गांभीर्याने विचार होत असल्याचे दिसत नसले तरी तयारी मात्र सुरू केली आहे. ऐनवेळी धावपळ व्हायला नको अशीच भूमिका भाजपची दिसते. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवर प्रबळ दावेदारी असलेल्यांनाच निवडणूक प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले आहे. वाळव्यातून माजी नगराध्यक्ष निशींकांत पाटील, शिराळ्यातून सम्राट महाडिक, तासगावमधून खासदार पुत्र प्रभाकर पाटील, सांगलीतून शेखर इनामदार, कडेगावमधून संग्रामसिंह देशमुख, आटपाडीतून अमरसिंह देशमुख, मिरजेतून पालकमंत्री सुरेश खाडे यांचे स्वीय सहायक तथा भाजप अनुसूचित जाती जमाती सेलचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे आणि जतमधून जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमणगोंडा रवि पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त केलेले पदाधिकारी मातब्बर आहेत. यापैकी बहुसंख्य नेत्यांची विधानसभेची तयारी सुरूच असते. शिराळ्याचे महाडिक, वाळव्याचे पाटील, कडेगावचे देशमुख यांनी तर २०१९ ची निवडणूक लढवली आहे. तर जतचे रवि पाटील यांनी गतनिवडणुकीवेळी उमेदवारीचा अखेरपर्यंत आग्रह धरला होता. पूर्व भागातील ४०हून अधिक गावांमध्ये त्यांचा गट केवळ सक्रियच नव्हे तर ग्रामपंचायतीच्या सत्तेत आहे. उङ्खशिक्षित, मराठीसह सीमाभागातील कन्नड आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले तरुण नेतृत्व म्हणून पक्ष रवि पाटील यांच्याकडे पाहत आहे. यामुळे त्यांचीही उमेदवारीची दावेदारी आता अधिक प्रबळ मानली जात आहे.

हेही वाचा – हरियाणामध्ये भाजपा-जेजेपी यांच्यातील युती तुटणार? मनोहरलाल खट्टर यांच्या विधानामुळे संभ्रम वाढला!

विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीचा विचार करत असताना पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीचे मूल्यमापन निश्‍चितच केले जाणार. लोकसभा निवडणुकीवेळी पक्षासाठी कोण अधिक मतदान मिळवते हाही निकष महत्त्वाचा ठरणार आहेच. यावरच पारंपारिक चेहरा बाजूला ठेवून नव्यांना संधी द्यायचीच असा जर निर्णय झाला तर या प्रचार प्रमुखांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, असा संकेत या निमित्ताने मिळाला आहे. यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली असून या नियुक्तीच्या निमित्ताने सत्कार, गावभेटीचे कारण पुढे करीत संपर्क अभियान राबविण्याची आणि उमेदवारीची दावेदारी अधिक प्रभावी करण्याची संधी पक्षानेच उपलब्ध करून दिली आहे.