सांगली : महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब पटकावणारे पैलवान चंद्रहार पाटील यांनी अखेर शिवबंधन हाती बांधत राजकीय स्थैर्य सध्या तरी मिळवले. यामुळे सांगली लोकसभेसाठीचा संभ्रम मात्र अभूतपूर्व वळणावर पोहचला असून महाविकास आघाडीमधून सांगलीची जागा उबाठा शिवसेनेला की काँग्रेसला याबाबतच संभ्रम निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये सांगलीची जागा भाजपला मिळणार हे स्पष्ट असताना महाविकास आघाडीतील संभ्रम चक्रावून टाकणारा तर आहेच, पण यामागे आघाडीतील काही शुक्राचार्यही या एकूण संभ्रमावस्थेला कारणीभूत असल्याचीही चर्चा आहे. काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांनाच मिळावी अशी एकमुखी मागणी करत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आ. डॉ. विश्वजित कदम यांचे नेतृत्व मान्य केले आहे. हीच आघाडीतील मित्रपक्षाच्या नेत्याची डोकेदुखी ठरलेली आहे का अशी शंका व्यक्त केली जात असून या सर्व घडामोडीमागे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हेच कारणीभूत असल्याची दबक्या आवाजात चर्चाही सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा