सांगली : राजकीय पक्षांची एकीकडे लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीत हस्तक्षेप करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपला पक्षविस्तार सुरू ठेवला आहे. राजकीय पाठबळ असलेल्या घराण्यात असलेल्या चार भींतीतील संघर्षाला फुलवून दुसर्‍या फळीत असलेल्या कार्यकर्त्यांना आपल्या गटात घेउन पक्ष विस्ताराची भूमिका ठेवली आहे.

विट्यातील माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असली तरी त्यांचे पिताश्री माजी आमदार सदाशिवराव पाटील हे आपल्या निष्ठा अद्याप शरद पवार यांच्याशी असल्याचे सांगत आहेत, तर मिरजेतील माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचे बंधू माजी नगरसेवक जमिल बागवान यांनी नुकताच दादा गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे महापालिका क्षेत्रात पक्ष प्रवेशाची जबाबदारी सोपवून शहर जिल्हा कार्याध्यक्ष पद सोपवले आहे. तत्पुर्वी स्थायी समितीच्या माजी सभापती संगीता हारगे यांच्या जाउबाई राधिका हारगे यांच्याकडे महिला आघाडीचे शहराध्यक्षपद सोपवून त्याही घरातील दुहीचा राजकीय लाभ दादा गटाने घेतला आहे.

Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”

हेही वाचा : अजित पवार यांना कर्जतमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे शक्तिप्रदर्शनातून प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे जाहीर करीत या गटाची खिंड लढविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला पोषक भूमिका जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी म्हणजे शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, तासगाव-कवठेमहांकाळच्या सुमनताई पाटील आणि पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरूण लाड यांनीही हीच भूमिका घेतली. पक्षाचे अनेक पदाधिकारी या भूमिकेच्या समर्थनार्थ ठामपणे उभे राहिले. मात्र, मिरजेतील माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी अजितदादांनी सत्तेत सहभागी होउन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्याच दिवशी क्षणाचाही विलंब न करता दादांना पाठिंबा देत शुभेच्छाचे फलक झळकावले. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र माजी नगरसेवक अतहर नायकवडी, योगेंद्र थोरात यांनीही दादा गटात सहभागी होत असल्याचे जाहीर करून आमदार पाटील यांच्या नेतृत्वाचा त्याग केला.

सध्या तरी नजीकच्या काळात महापालिका निवडणुका नसल्याने राजकीय पक्षातील आवक-जावक थंडावली असली तरी पडद्याआड बर्‍याच हालचाली सुरू आहेत. आमदार पाटील यांच्या राजकीय शयतीमध्ये घट करण्याचा उपमुख्यमंत्री अजितदादांचा हेतू स्पष्टपणे दिसत आहे. कारण कोल्हापूर दौर्‍यावर जात असताना वैभव पाटील यांनी केलेले स्वागत, पेठ नाका येथे महाडिक युवा शक्तीने केलेले स्वागत, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशीकांतदादा पाटील यांनी केलेले स्वागत यामागे निश्‍चितच कार्यकारण भाव असल्याचे जाणवते. यातून आमदार पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच शह देण्याचा प्रयत्न दिसतो.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयोध्येनंतर नाशिकमधील राष्ट्रीय युवा महोत्सवात शक्तीप्रदर्शन

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत मिरजेतून राष्ट्रवादीला मोठी ताकद मिळाली होती. महापौर निवडीवेळी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून आघाडीचा महापौर करण्यात मिरजेतील राष्ट्रवादीची ताकद मोठी होती हे नाकारून चालणार नाही. मात्र, डाव यशस्वी होतोय हे लक्षात येताच बागवान यांचे पुन्हा महापौर पद मिळविण्याचे स्वप्न भंगले तेही मिरजेतील राजकीय कुरघोडीच्या कारणातून हे वास्तव आहे. यातूनच बागवान कुटुंबातील घरगुती मतभेदाला राजकीय रंग आणि ताकद मिळू लागली. या कलहातून माजी नगरसेवक जमिल बागवान यांच्या ताकदीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सत्तेच्या आड सुरू राहिला. यातूनच हा संघर्ष टोकाच्या पातळीवर गेला. हीच स्थिती हारगे कुटुंबातील झाल्याचे दिसते. स्थायी समितीच्या माजी सभापती संगीता हारगे यांना सत्तेची संधी मिळाली तरी कुटुंबातील अन्य मंंडळींना सत्ता कध मिळणार याची भ्रांत लागून राहिली होती. जावा-जावा यांच्यामध्ये सुरू असलेला राजकीय सत्तेचा संघर्ष तेवत होता. त्याला वारा देउन पुन्हा चेतवण्याचा प्रयत्न झाला आणि राधिका हारगे यांचा दादा गटातील प्रवेश निश्‍चित झाला. त्यांना पदही देण्यात आले. म्हणजे एकाच घरातील दोन महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात सहभागी झाल्या. आता यापुढील राजकीय संघर्ष महापालिका निवडणुकीवेळी तीव्र पणे समोर येणार आहे.

हेही वाचा : पालघरची जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची !

आमदार जयंत पाटील यांच्यावर नाराज होउन आपण दादा गटात सहभागी झालेलो नाही. मात्र, गेल्या काही वर्षात पक्षाच्या गटनेत्यांनी ताकद देण्याऐवजी आडवा-आडवीची भूमिका घेतली. विकास कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. गटनेता या नात्याने पाठबळ देण्याचे तर दूरच पण स्वीकृत सदस्य देण्याचा शब्दही लांबविण्याचा प्रयत्न केला. या उलट भाजपकडून मिळालेला दीड कोटींच्या निधीतून लक्ष्मी मार्केटची दुरूस्ती, मिरासाहेब दर्ग्यात भाविकांना सोयी सुविधा देण्यात आपणाला यश आले. यामुळेच कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी नगरसेवक जमिल बागवान यांनी सांगितले.

Story img Loader