सांगली : सांगलीत भाजपने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना लोकसभेच्या आखाड्यात तिसर्‍यांदा उमेदवारी दिली असली तरी पक्षातील ज्यांच्याकडे मतदानाचा मोठा टक्का असलेल्या नेत्यांनी मात्र या उमेदवारीला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष विरोध दर्शवला असल्याने पक्षांतर्गत नाराजी कशी हाताळली जाते यावर हॅटट्रिकचे गणित अवलंबून राहणार आहे. खासदार पाटील यांनी निवडणुकीच्या लढाईतील पहिला टप्पा पार केला असला तरी प्रचाराच्या रणधुमाळीत समर्थक सोबत राखण्याबरोबरच पक्षाअंतर्गत विरोधक प्रचारासाठी घराबाहेर काढण्याची शिकस्त करावी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सांगली मतदार संघ शिवसेनेला मिळावा यासाठी मुंबईच्या पातळीवरून घडामोडी घडत आहेत. बहुजन वंचित आघाडीसोबत बोलणी करून त्यांचा शब्द घेउन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी अखेर मातोश्रीवर जाउन ठाकरे शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागेवर शिवसेनेचा दावा आहे. जर महाविकास आघाडीतून जागा ठाकरे शिवसेनेला मिळाली तर पैलवान मैदानात मशाल घेउन असतील. आणि जर काँग्रेसला मिळाली तर स्व.वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे मैदानात असतील. मात्र, हे जागा वाटप महाविकास आघाडीतील काँग्रेसला पटेलच असे सध्या तरी दिसत नाही. यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची उरलीसुरली ताकदही दिशाहिन बनण्याचा धोका आहेच. यदाकदाचित विशाल पाटील यांना बंडखोरी करून मैदानात उतरण्यासाठी भाजपमधील काही शक्ती प्रयत्नशील राहतील. या आग्रहाला ते कसे प्रतिसाद देतील यावर निवडणुकीची चुरस अवलंबून राहणार आहे.

appasaheb jagdale
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या ! आप्पासाहेब जगदाळे यांनी दिला आमदार दत्तात्रय भरणेंना पाठिंबा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Loksatta anvyarth Ten elephants died in the Bandhavgarh tiger project in Madhya Pradesh
अन्वयार्थ: हत्तीएवढ्या दुर्लक्षाचे बळी
all party leaders meet mahesh patil in hospital after bitten by snake
साप चावलेल्या कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील यांची सर्व पक्षीय नेत्यांकडून विचारपूस
Indian Context of Federalism Loksatta Lecture Dhananjay Chandrachud
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ
Chandrakant Patil, rebellion in Jat, Jat,
जतमधील बंडखोरी टाळण्याचे चंद्रकांत पाटलांचे प्रयत्न निष्फळ
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
maharashtra assemly election 2024 Rebellion challenge of Dr Devrao Holi and Ambrishrao Atram for BJP in aheri and gadchiroli Constituency
भाजपपुढे होळी, आत्रामांच्या बंडखोरीचे आव्हान, फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष….

हेही वाचा : अपहरण प्रकरणातील दोषी निवडणुकीच्या रिंगणात? कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात ठोकला शड्डू

भाजपची उमेदवारी धक्कादायक असेल असे मानले जात होते. यावेळी कोणत्याही परिस्थितीत चेहरा बदलला जाईल असे पक्षाच्या निष्ठावान गटाबरोबरच विरोधकांनाही वाटत होते. अखेर खासदार पाटील यांनी उमेदवारीची लढाई मनासारखी जिंकत पक्षांतर्गत विरोधकांवर मात केली आहे. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख कालपर्यंत आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचा दावा करत होते. गेली दोन वर्षे त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदार संघात जुळणीही केली होती. महाविकास आघाडीच्या काळात राष्ट्रवादीतूनच निर्माण झालेल्या दुष्काळी फोरममधील नेते मंडळी खासदार पाटील यांच्या उमेदवारीला उघड उघड विरोध करत होते. यामध्ये जतचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे आणि खानापूर-आटपाडीतील बाबर गटाचा समावेश आहे. या मंडळींची नेमकी भूमिका काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी जगताप यांनी पाटील यांच्या उमेदवारीचा विरोध करत प्रचार करण्यास नकार दिला आहे. अशा नाराज मंडळींची समजूत कशी काढली जाते यावर पुढील मतांची गणिते अवलंबून राहणार आहेत. जगतापांची नाराजी आताच आहे अशातील भाग नाही, तर विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचे खापर त्यांनी खासदार पाटील यांच्यावरच फोडले होते. यामुळेच सावध असलेल्या खासदारांनी जतमध्येही नवे मित्र जोडून ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभेच्या जगतापच्या उमेदवारीला आव्हान देउ पाहणारे माजी सभापती तमणगौडा रविपाटील यांच्याशी त्यांनी मैत्री करत असताना माजी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याशीही मैत्री ठेवली आहे. पलूस-कडेगावमध्ये होउ शकणारे नुकसान तासगावमध्ये भरून काढण्यासाठी पडद्याआड खासदारही आमचा, आमदारही आमचाच हा नारा आतापर्यंत उपयुक्त ठरला तो नारा पुन्हा उजळला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : नगरमध्ये आरक्षणावर नामांतराची मात्रा

‘पार्टी वुईथ डिफरन्स’ अशी ओळख सांगितल्या जात असलेल्या भाजपमध्येही आता नेत्यांची गर्दी झाल्याने गटबाजीची लक्षणे दिसत आहेत. या गटबाजीतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज मंडळींचा एक गट कार्यरत होउन महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार जाहीर होतो याची प्रतिक्षा केली जाणार आहे. जर सोयीचा उमेदवार आला तर निश्‍चितच पक्षातील नाराजीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यावर पक्षाचे वरिष्ठ म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशी मात करतात यावर पुढचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. पक्ष देईल त्या उमेदवाराच्या विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा ठराव गेल्याच आठवड्यात पक्षाच्या सुकाणू समितीत करण्यात आला होता. हा ठराव जगतापांनी मांडला होता, तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनुमोदन दिले होते. आता खरे काय होते हे महाविकास आघाडीच्या उमेदवार निश्‍चितीनंतर कळणार आहे.