सांंगली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापुर्वीच विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली असून जिल्ह्यात जागेसाठी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीमध्येच अधिक घमासान पाहण्यास मिळण्याची चिन्हे आहेत. जागा कमी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने जागा वाटपानंतर संभाव्य बंडखोरी टाळण्यात पक्ष नेत्यांची खरी कसोटी लागणार आहे. विशेषत: जत, खानापूर-आटपाडी अधिक पाहण्यास मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास अजून अवधी असला तरी स्थानिक पातळीवरून आतापासूनच विधानसभेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी काँग्रेसकडे दोन, राष्ट्रवादीकडे तीन, भाजपचे दोन आणि शिवसेना शिंदे गटाकडे एक असे पक्षिय बलाबल सध्या आहे. यापैकी शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खानापूर-आटपाडीचे अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही जाग रिक्त आहे. भाजपने जिल्ह्यातील आठही मतदार संघ जिंकण्याच्यादृष्टीने तयारी केली असून त्यादृष्टीने चाचपणी सध्या सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती मतदान झाले यावर विधानसभेची गणिते अवलंबून राहणार असली आणि त्यावर उमेदवार निश्चित केले जाणार असले तरी इच्छुकांना आता घाई झाल्याचे दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा