दिगंबर शिंदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सांगली : खासदार संजयकाका पाटील यांनी जतमध्ये सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजप पदाधिकार्यांना बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घेउन केल्याने जतमध्ये खासदार नेमके कोणत्या पक्षाचे असा सवाल भाजपच्या पदाधिकार्यांनी उपस्थित केला आहे. या निमित्ताने स्थानिक पातळीवरील भाजपअंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून पक्षांतर्गत असलेली खदखद उफाळून आली आहे.
जतच्या ४२ गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा करताच गेल्या पंधरा दिवसापासून जत तालुका चर्चेच्या केंद्र स्थानी आला आहे. सीमाभागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनानेही तातडीने दखल घेत विस्तारित म्हैसाळ योजनेला मंजुरी दिली असून येत्या काही दिवसांत या कामाची निविदा प्रसिध्द होण्याच्या मार्गावर आहे. याच पार्श्वभूमीवर बातम्यांच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्ष श्रेयवादात उतरले आहेत.
जतच्या वंचित गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कमीअधिक प्रयत्न केले आहेत हे जरी खरे असले तरी श्रेय कोणाला द्यायचे हे आम जनताच ठरविणार आहे. या राजकीय गदारोळात खासदार पाटील यांनी जतमध्ये संपर्क कार्यालय दोन दिवसापुर्वी सुरू केले. जत शहरात सुरू झालेल्या खासदार संपर्क कार्यालयावरून भाजप अंतर्गत असलेले मतभेद उफाळून आले आहेत.
हेही वाचा >>> राजकीय आरोप -प्रत्यारोपांच्या फैरीत विदर्भाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष
संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित नव्हते. याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती मात्र नजरेत भरण्यासारखी होती. यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनालाच आक्षेप घेत खासदार नेमके कोणत्या पक्षाचे असा सवाल उपस्थित केला आहे. संपर्क कार्यालय उद्घाटनासाठी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, सुरेश शिंदे, भैय्या कुलकर्णी ही राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी आवर्जुन उपस्थित राहिली. मात्र, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती तमणगोंडा रवि पाटील, तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत हे उपस्थित नव्हते. त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रणच देण्यात आले नसल्याची माहिती पुढे आली आहे.
यामुळे तालुकाध्यक्ष सावंत यांनी खासदार नेमके कोणत्या पक्षाचे असा सवाल उपस्थित केला आहे. याबाबत पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनाही आपण कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीवेळी माजी आमदार जगताप यांच्या पराभवाला खासदार गटच कारणीभूत असल्याचा पुर्नरूङ्खार यावेळी करण्यात आला असून आगामी लोकसभेच्या उमेदवारी वेळी हा मुद्दा अधिक प्रकर्षाने राजकीय साठमारीत पुढे आल्यास नवल वाटणार नाही. एकूणच काय काँग्रेसमध्ये चालू असलेली गटबाजीची परंपरा शिस्तबध्द म्हटल्या जात असलेल्या भाजपनेही स्वीकारली असेच म्हणावे लागेल. काँग्रेसला गटबाजीमुळेच सत्तेच्या परिघाबाहेर जावे लागले, तीच वेळ भाजपवर येते की मलमपट्टीचा इलाज केला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.