वाई : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाच्या ताब्यात असलेला सातारा मतदारसंघ पक्षातील फुटीनंतर कायम राखण्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला यश येते का, याचीच अधिक उत्सुकता या मतदारसंघात आहे. यंदा राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात कमालीची चुरशीची लढत होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहारात शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने तो प्रचाराचा मुद्दा झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ मध्ये स्थापना झाली आणि लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीने विजय संपादन केला होता. त्यानंतर गेली २५ वर्षे हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. २०१९ मध्ये उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या वतीने निवडून आले पण त्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला होता. असा हा राष्ट्रवादीचे बालेकिल्ला असलेला मतदारसंघ राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गटाकडे कायम राहतो का, याचीच सर्वाधिक उत्सुकता आहे. अजित पवार गटाने हा मतदारसंघ भाजपच्या उदयनराजे यांच्यासाठी सोडून तलवार मान्य केली. यामुळे साताऱ्यात खरी राष्ट्रवादी कोणती याचा जनमताचा कौल समजणे शक्य नाही.

former MLA ratnagiri Rajan Salvi subhash bane Ganpat Kadam
राजन साळवी येत्या तीन तारखेला भाजपात, रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी दोन आमदार…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Why is there a delay in the appointment of candidates who have passed MPSC
कोलमडलेले वेळापत्रक, न्यायालयीन विलंब, लालफीतशाही… ‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब का होतो?
anti extortion squad by mira bhayandar police commissionerate
व्यावसायिकाना धमकवण्याचे प्रकार वाढले; खंडणी विरोधी पथकाची स्थापन
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
allegations over the post of Guardian Minister of Raigad
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आरोपप्रत्यारोप
Narendra Modi JP Nadda
भाजपावर मतदारांसह देणगीदारांचीही कृपा, वर्षभरात तब्बल ३,९६७ कोटींच्या देणग्या, ८७ टक्के वाढ
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

हेही वाचा : कलम ३७० वर काँग्रेसचे मौन तरीही आम्ही समजून घेतोय; ओमर अब्दुल्लांचं विधान

विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लढण्यास नकार दिला. यामुळे राष्ट्रवादीत उमेदवारीचा तिढा होती. काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षाने प्रस्ताव दिला होता पण त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीने लढण्यास नकार दिला. शेवटी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शशिकांत शिंदे यांना पक्षाने रिंगणात उतरविले आहे. दुसरीकडे, लोकसभेत पराभव झाल्यावर मागील दाराने खासदारकी मिळविलेल्या उदयनराजे भोसले यांना उमेदवारीसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. दिल्लीत ठाण मांडून बसावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असल्याने भाजप नेतृत्वाचा नाईलाज झाला. काँग्रेसने कोल्हापूरमध्ये शाहू महारांजांना उमेदवारी दिल्याने भाजपपुढे साताऱ्यात पर्याय नव्हता.

हेही वाचा : अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी पत्नी सुनीता यांनी केलेला अर्ज फेटाळला? काय आहे नियम?

उशिराने उमेदवारी जाहीर होऊन ही राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेत रंगत आणली आहे. उदयनराजे आणि शशिकांत शिंदे गावोगावी जाऊन गाठी भेटी सभा आणि प्रचारावर भर दिला आहे. मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मागील वेळी कराड उत्तर व कराड दक्षिण आणि पाटण या मतदारसंघांतून उदयनराजेंना कमी मताधिक्य मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. यावेळी मात्र त्यांनी या भागातील प्रचाराला प्राधान्य दिले आहे. ५० टक्के मतदार या तीन विधानसभा मतदारसंधांमध्ये असल्याने आपल्याकडे वळवण्यासाठी दोघांचाही प्रयत्न आहे. जिल्ह्यात शरद पवारांना मानणारा मोठा मतदार असल्याने उदयनराजेंना निवडणूक सोपी नाही. त्यांनी शशिकांत शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठी मुंबई बाजार समितीतील घोटाळा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात एका माजी संचालकाला अटक ही झाली. कोरेगावचे आमदार महेश शिंदे व माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून हा मुद्दा महत्त्वाचा राहिल् असा प्रयत्न केला . शशिकांत शिंदे हे महत्त्वाचे आरोपी आहेत असेही मतदारांवर ठसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने मतदारसंघाचा विकास, बेरोजगारी, पाण्याचे , पर्यटनाचे, उद्योगाच्या प्रश्नावरून प्रचार भरकटल्याचे दिसून येते. शशिकांत शिंदे मात्र आपल्यावरील आरोपांना बचावात्मक विरोध करताना दिसतात. विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचे ते सांगतात. दोघेही एकमेकांवर कोणतेही वैयक्तिक आरोप करताना दिसत नाहीत. उभय बाजूने आपापले कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात उतरवले आहेत. वैयक्तिक वाद बाजूला ठेवून उदयनराजे यांचे चुलते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अत्यंत आक्रमकपणे प्रचारात उतरले आहेत. उदयनराजेंबरोबरचे जुने वाद विसरून प्रचार सुरू केला आहे. उदयनराजेंच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांनी पक्षादेश असल्याचे सांगत वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघात उदयनराजेंना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील कार्यकर्ते एकजुटीने राहिले तर उदयनराजेंना निवडणूक जड जाईल मात्र त्यांनी पक्ष संघटनेच्या बळावर या विरोधात जायची तयारी केली आहे.

हेही वाचा : भाजपाला ‘हुकुमशाही’ म्हणणाऱ्या प्रचारगीतावर निवडणूक आयोगाचा आक्षेप का? आपची टीका

मतदारसंघात जातीय समीकरणे परिणामकारक ठरू शकत नाहीत. साताऱ्याला राजकारणाला एक पुरोगामीत्वाचा वारसा असेआहे . जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या मोठा परिणाम निवडणुकीवर जाणवत नाही. राष्ट्रवादीसाठी सातारा कायम राखण्याचे आव्हान असताना उदयनराजे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. लागोपाठ दुसरा पराभव झाल्यास साताऱ्यातील त्यांचे राजकीय वर्चस्व लयाला जाईल. यातूनच दोन्ही बाजू अत्यंत कडवटपणे रिंगणात उतरल्या आहेत.

Story img Loader