विजय पाटील

करोना महामारीमुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची चाचपणी सुरू असताना सातारा जिल्ह्यावर वर्चस्व असणारी राष्ट्रवादी काँग्रेस थेट मुख्यमंत्र्यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेचे खच्चीकरण करीत असल्याची नाराजी शिवसेना नेत्यांनीच जाहीरपणे व्यक्त केल्याने महाविकास आघाडीमधील मुस्कटदाबी चव्हाट्यावर आली आहे.

शहांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Prithviraj Chavan comment on Amit Shah, Amit Shah ,
अमित शहांच्या विधानातून संघाच्या द्वेष भावनेचे प्रदर्शन, पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला निशाणा
opposition angry over Amit Shahs controversial statement about dr babasaheb ambedkar
‘बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान’, अमित शहांच्या वादग्रस्त मुद्यावर विरोधक संतप्त
Bharat Gogawale, Aditi Tatkare, Raigad Guardian Minister, Raigad ,
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आमदारांचे लॉबींग
Ambadas Danve Vs Neelam Gorhe News
Neelam Gorhe संसदेत अमित शाह यांचं बाबासाहेब आंबेडकरांबाबत वक्तव्य, विधान परिषदेत पडसाद उमटताच नीलम गोऱ्हे विरोधकांवर संतापल्या, “चुकीच्या…”
Thackeray group MP Arvind Sawant questions whether the Constitution was forgotten while breaking Shiv Sena print politics news
शिवसेना फोडताना संविधानाचा विसर? ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा सवाल
Rupali Thombre Patil on Ajit Pawar
“अजित पवारांनी उद्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युती केली तरी..”, रुपाली ठोंबरे पाटील यांचं अजब विधान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने राज्य सरकारचा, विशेषतः आपल्या कामाचा आलेख मांडताना स्थानिक परिस्थितीनुसार मित्रपक्षांच्या नेत्यांना चिमटा काढण्याची संधी दवडली नाही. तर शिवसंपर्क अभियानातून थेट शिवसैनिकांशी संवाद साधताना पक्षनिरीक्षक खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर राष्ट्रवादीकडून खच्चीकरण होत असल्याच्या तक्रारी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावतंत्राने शिवसैनिक त्रस्त असण्याबरोबरच सत्तेचा वाटा मिळतच नसल्याची ओरड समोर आल्याने आणि याबाबत पक्षनिरीक्षक खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा अन्याय दस्तुरखुद्द मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे ठळकपणे मांडणार असल्याचा इशारा दिल्याने महाविकास आघाडीमधील संघर्ष टोकदार बनण्याची चिन्हे आहेत.शिवसैनिकांना विरोधक असणाऱ्या भाजपपेक्षा महाविकास आघाडीतील मोठे वाटेकरी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनच त्रास होत आहे. शिवसैनिकांचे खच्चीकरण होताना आघाडीतील सत्तेचे सूत्र पाळले जात नाही. ‘ना सत्तेचा वाटा, ना मिळाला मानसन्मान’ अशा अनेक व्यथा मांडल्याचे समोर आल्याने याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

एकीकडे शिवसेनेवर प्रहार करत भाजप आक्रमकपणे अनेक आंदोलने करून जनतेचा आवाज बनत असताना मित्रपक्षांकडूनच शिवसेनेची कोंडी होत असेल तर मुख्यमंत्र्याच्या संघटनेला येत्या काळात नेमके कोणाशी लढावे लागेल? असाही प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहत नाही.सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे पाटण व कोरेगाव या मतदारसंघांत आमदार आहेत. परंतु यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पक्षासी जवळपास फारकत घेतल्याचे दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगोल्याचे शहाजी बापू पाटील, आटपाटीचे अनिल बाबर यांच्यासोबतच कोरेगावचे शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या सत्तेचा कुठलाही फायदा मतदारसंघापर्यंत पोहोचत नसल्याने कधीच नाराजी प्रगट करण्यास सुरूवात केलेली आहे. याअंतर्गतच कोरेगावच्या आमदार शिंदे यांनी आताच भाजपची वाट धरल्याचे दिसत आहे. दुसरीकडे पाटणचे शिवसेनेचे आमदार असलेले शंभूराज देसाई यांना मंत्रिपदाची संधी दिली असली तरी जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना त्यांच्याच मतदारसंघात सध्या संघर्ष करावा लागत आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत या महाविकास आघाडीअंतर्गत संघर्षातूनच मंत्री देसाई यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीने आपली ताकद आघाडीविरोधातील गटाकडून लढणाऱ्या पण मुळचे राष्ट्रवादीचे असलेल्या सत्यजित पाटणकरांच्या मागे उभी केल्याने हा पराभव घडला. वरवर दाखवण्यासाठी महाविकास आघाडी असे चित्र असले तरी प्रत्यक्षात खाली मात्र केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच विस्तार आणि विकास होताना दिसत असल्याची भावना शिवसेनेसोबतच कॉंग्रेसमधूनही व्यक्त होत आहे. सत्तेत वाटा नाही, सत्तेचे फायदे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नाहीत, पक्षाकडून याची दखल नाही या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेनेत मोठी अस्वस्थता आहे.

Story img Loader