सावंतवाडी: वैयक्तिक स्वार्थापोटी कोणी अपशकून करत असेल तर मी त्याला प्रचारासाठी विनंती करणार नाही. अशा लोकांची मी पर्वा करत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रविवारी येथे व्यक्त केली. भाजपातर्फे आयोजित सभा आणि कार्यालयाच्या उद्घाटनाला येण्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी टाळले, असे सूचित करत माजी आमदार आणि या लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक राजन तेली यांनी व्हॉट्सॲप अकौंटवर स्टेट्सद्वारे नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : राहुल गांधींनी म्हैसूर पाकची मिठाई केली खरेदी अन् ‘भाऊ’ एमके स्टॅलिन झाले भावुक; नेमकं काय घडलं?

या पार्श्वभूमीवर राणे रविवारी सकाळी केसरकर यांच्या कार्यालयात आले असता, या स्टेट्सचा संदर्भ देत, कोणाच्या हट्टामुळे विधानसभा मतदारसंघातील दोन सभा रद्द झाल्या, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राणे म्हणाले की, मी कोणाची नाराजी पाहत नाही, तर पक्षहित पाहतो. महायुतीचा विजय महत्त्वाचा आहे. वैयक्तिक स्वार्थापोटी कोणी अपशकून करत असेल तर त्याची पर्वा करणार नाही आणि कोणाला विनंती करणे माझ्या राशीत नाही. ही टीप्पणी करताना राणेंनी तेली यांचे नाव मात्र घेतले नाही. सुमारे पंधरा वर्षांनंतर राणे प्रथमच केसरकर यांच्या कार्यालयात आले. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, राजकीय जीवनात कोण कोणाचा शत्रू नसतो. केसरकर आणि माझ्यात वैयक्तिक वाद नव्हते. तो राजकीय वाद होता, असे स्पष्ट केले.

Story img Loader