इंडिया आघाडीला शह देण्याकरिता भाजपने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत अण्णा द्रमुकचे सरचिटणीस पलानीस्वामी यांना पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बसण्याची संधी देण्यात आली होती. पण अल्पावधीतच राज्यातील भाजप नेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अण्णा द्रमुकने युती तोडल्याचे जाहीर केल्याने तमिळनाडूत स्वबळावर ताकद अजमविण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे असेल. यामुळेच लोकसभा निवडणुकीपर्यंत अण्णा द्रमुक पुन्हा युती करेल, असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त केला जात आहे.

लोकसभेच्या ३९ जागा असलेल्या तमिळनाडूत भाजपला अद्यापही हातपाय पसरता आलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकबरोबरील युतीत चार जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने स्वबळावर लढताना स्वत:चे अस्तित्व दाखवून दिले होते. तमिळनाडूत पक्ष विस्तारण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: लक्ष घातले आहे. तमिळनाडूतील युवकांना आकर्षित करण्याकरिता मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात तामीळ संगम या दहा दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्या आले होते.

shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल

हेही वाचा : एमआयएम महिला विरोधी, खासदार जलील यांना अडचणीत आणण्याची भाजपची खेळी

यासाठी सुमारे १० हजार युवकांना वाराणसीची सहल घडविण्यात आली. अशाच प्रकारे गुजरातमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवीन संसदेत लोकसभा सभागृहात तमिळनाडूची पार्श्वभूमीवर असलेला राजदंड बसविण्यात आला. उद्घाटन सोहळ्यात तमिळनाडूतील पुजाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. अमेरिका दौऱ्यात मोदी यांनी ‘वन्नकम’ने सुरुवात करून परदेशातील तामीळी जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न केला होता.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावरून केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोदी यांनी त्याची दखल घेत प्रत्युत्तर देण्याचा आदेश भाजप नेत्यांना दिला. सनातन धर्माच्या वादाला भाजपकडून अजूनही खतपाणी घातले जात आहे. तमिळनाडूतही त्याचा राजकीय उपयोग करून उच्चवर्णियांची मते मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

हेही वाचा : पुणे भाजपवर घराणेशाहीचा पगडा, जुनेजाणते घरी

अण्णा द्रमुकने युती तोडून स्वबळावर आघाडी करून लढण्याचे जाहीर केले. अण्णा द्रमुक अजूनही युती करेल, असा भाजप नेत्यांना विश्वास वाटतो. पण युती झाली नाही तर भाजपपुढे आव्हान असेल. द्रवीडी संस्कृतीचा पगडा असलेल्या तमिळनाडूत भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला कितपत पाठिंबा मिळेल याबाबत साशंकतता व्यक्त केली जाते. याबरोबरच द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन प्रादेशिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत होणार असल्यास भाजपचा कितपत निभाव लागेल हा सुद्धा प्रश्न आहे.

तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अण्णा द्रमुकचे नेते दुखावले होते. त्यांनी अण्णा दुराई आणि जयललिता यांच्यावरच टीका केली होती. तमिळनाडूच्या राजकारणात मते मिळविण्यासाठी करिश्मा आवश्यक असतो. भारतीय पोलीस सेवेचा (आय.पी.एस.) राजीनामा देऊन राजकारणात आलेल्या अन्नामलाई यांचा राजकीय करिश्मा अजिबात नाही. यामुळे मोदी यांच्या नेतृत्वावरच भाजपची सारी मदार असेल. अण्णा द्रमुकने युती तोडल्याने नुकसान होत असल्याचे भाजप नेतृत्वाच्या निदर्शनास आल्यास अन्नामलाई यांना अध्यक्षपदावरून हटवून भाजप नेते पुन्हा अण्णा द्रमुकशी जुळवून घेऊ शकतात, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Story img Loader