सागर नरेकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकेकाळी गड असलेल्या कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर या तालुक्यात गेल्या दशकभरात भाजपची ताकद वाढली आहे. मात्र भाजपच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले वाकयुद्ध आणि दुरावा पक्षासाठी डोकेदुखी ठरत होती. किसन कथोरे यांच्या एका कार्यक्रमामुळे या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. किसन कथोरे लोकसभा लढवणार का या प्रश्नाला मंत्री कपिल पाटील यांच्यासमोरच किसन कथोरे यांनी नकार देत आपण विधानसभाच लढवणार असल्याचे सांगून चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
Sharad Pawar On Rohit Pawar Rohit Patil
Sharad Pawar : रोहित पवारांना डावलून रोहित पाटील यांना प्रतोद का केलं? शरद पवारांनी सांगितलं मोठं कारण
Chhagan Bhujbal On Opposition MLAs
Chhagan Bhujbal : विरोधी पक्षांच्या आमदारांनी जर उद्या शपथ घेतली नाही तर काय होणार? भुजबळ म्हणाले…
Vijay Rupani devendra Fadnavis
Vijay Rupani : दिल्लीतून निरोप घेऊन निरीक्षक रुपाणी मुंबईत, मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचं नाव निश्चित झालंय का? म्हणाले…
Jitendra Awad, Rohit Patil and Uttam Jankar
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा महत्वाचा निर्णय; जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील आणि उत्तम जानकरांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला कपिल पाटील आणि विधानसभा निवडणुकीत किसन कथोरे यांनी भाजपात प्रवेश करून येथे भाजपचा झेंडा फडकवला. त्यानंतर येथील सर्वच स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला सत्ता मिळाली. २०१९ लोकसभा निवडणुकीत मिळालेली भरघोस यशानंतर काही दिवसात खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्री पदी संधी मिळाली. त्यामुळे पाटील यांचा स्थानिक राजकारणात दबदबा वाढला. तत्पूर्वी, किसन कथोरे सुरुवातीला अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात आमदार होते. त्यानंतर ती जागा राखीव झाल्याने किसन कथोरे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार बनले. सरपंच पद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँक असा मोठा प्रवास करणारे किसन कथोरे यांचे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण आणि भिवंडी तालुक्यात चांगले वर्चस्व आहे. त्यामुळे मधल्या काळात कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू झाला. पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये उमेदवार देण्यावरून हा वाद टोकाला गेला होता. या वादात काही ठिकाणी एकमेकांच्या उमेदवारांविरुद्ध अपक्षांना रसद पुरवली होती. या निवडणुकांमध्ये मुरबाड मध्ये कथोरे यांनी मुरबाड नगर परिषद राखली असली तरी पाटील यांना शहापूर राखण्यात अपयश आले. त्यानंतर पाटील आणि किसन कथोरे यांच्यातील संघर्ष तीव्र झाला. एकमेकांच्या कामातही चुका काढण्याचे प्रयत्न यावेळी झाले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्री पाटील यांनी कथोरे यांच्या कार्यपद्धतीवर घेतलेला आक्षेप चर्चेचा विषय ठरला.

हेही वाचा… काँग्रेसमधील गटबाजीवर वरिष्ठांचे मौन पुत्रप्रेमातून ?

एकीकडे शाब्दिक चकमकी, अंतर्गत वाद आणि कुरघोड्या सुरू असतानाच दुसरीकडे आमदार किसन कथोरे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरू झाल्या. किसन कथोरे यांचा जिल्ह्यातील जनसंपर्क पाहता ते शक्य असल्याचे अनेक समर्थकांना वाटू लागले होते. त्यामुळे भाजपात दोन गट पडल्याचे चित्र होते. त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेत चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. त्यातच काही दिवसांपूर्वी आमदार कथोरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील अशा अफवा सुरू झाल्या. त्यावर खुद्द किसन कथोरे यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र त्याबाबत अधिक स्पष्टता नसल्याने या चर्चा सुरूच होत्या. पक्षात पडलेले गट, एकाच पक्षाचे खासदार आणि मंत्री तसेच आमदार यांच्यात सुरू असलेले वाकयुद्ध या पार्श्वभूमीवर शुक्रवारी किसन कथोरे यांच्या राजकीय कारकिर्दीला ४२ वर्ष पूर्णत्वाच्या निमित्ताने त्यांच्या प्रकट मुलाखत आणि भविष्यातील विकासाचे मॅाडेल मांडण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी अचानक हजेरी लावल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या मुलाखत कार्यक्रमात मंत्री पाटील पूर्णवेळ बसून होते. त्यामुळे किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यात मनोमिलन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच. आमदार की खासदार या प्रश्नावर बोलताना मी आमदारच राहणार असे किसन कथोरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे किसन कथोरे लोकसभा लढवणार या प्रश्नालाही आता यानिमित्ताने पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा… मराठा आरक्षण प्रश्नी तूर्तास हस्तक्षेप करण्यास केंद्राचा नकार ?

मात्र अचानक झालेल्या या मनोमिलनामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. मुलाखत संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री कपिल पाटील यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आग्रहामुळे आपण आल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे किसन कथोरे यांनी घेतलेल्या पुढाकाराला पाटील यांनीही समर्थन दिल्याने हे मनोमिलन झाल्याचे बोलले जाते. चार ते पाच महिन्यात लोकसभा निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा वाद वाढणे मंत्री कपिल पाटील यांच्याही फायद्याचे नव्हते. किसन कथोरे हे विधानसभा निवडणुकीत भाजपात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले आमदार आहेत. त्यामुळे त्यांची आणि समर्थकांची नाराजी ओढवून घेणे भाजपसाठी धोक्याचे ठरले असते. त्यामुळे या वादावर पूर्णविराम दिल्याचे बोलले जाते.

Story img Loader