लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : जातीय सलोख्याबाबत महाराष्ट्राचा आदर्श असला तरी गेल्या सहा महिन्यांत राज्यातील नऊ शहरांमध्ये जातीय दंगल किंवा तणावाचे प्रकार घडले आहेत. ताजा प्रकार म्हणजे साताऱ्यातील जातीय दंगलीचा. समाज माध्यमावरून प्रसारित होणाऱ्या वादग्रस्त संदेशामुळे वातावरण कलुषीत होत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे.

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
Rajasthan Candidate Who Slapped sdm
‘थप्पड’ प्रकरणाने राजस्थानात तणाव; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप; अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांना अटक, समर्थकांकडून जाळपोळ
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
maharashtra assembly election 2024 karnataka telangana and himachal pradesh bjp leaders criticized congress
काँग्रेसशासित राज्यांमध्ये केवळ फसवणूक; कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील भाजपा नेत्यांची टीका
Manipur Violence :
Manipur Violence : मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई; ११ दहशतवादी ठार, दोन जवान गंभीर जखमी

राज्यात मार्चअखेरपासून जातीय तणावाचे प्रकार वाढीस लागले आहेत. रामनवमी उत्सवापासून संभाजीनगर, मुंबईतील मालाड मालवणी, अकोला नगरमध्ये शेवगाव आणि संगमनेर, जळगाव, कोल्हापूरमध्ये जातीय तणाव किंवा हिंसाचाराचे प्रकार घडले आहेत. साताऱ्यात रविवारी रात्री झालेली दंगल व हिंसाचार समाज माध्यमातील संदेशामुळेच घडली. या हिंसाचारात एक जण ठार झाला तर दहापेक्षा अधिक जखमी झाले. आतापर्यंत जातीय हिंसाचाराची पार्श्वभूमी नसलेल्या शहरांमध्ये जातीय हिंसाचाराचे प्रकार घडल्याने सरकारी यंत्रणाही सा‌वध झाल्या आहेत.

आणखी वाचा-कोल्हापूरातील भाजप अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; कार्यालयाला टाळे ठोकले

राज्यात रामनवमीपासून जातीय हिंसाचार वा तणावाचे प्रकार घडले आहेत. औरंगाबाद किंवा संभाजीनगरमध्ये जातीय दंगल झाली. त्यानंतर विविध शहरांमध्ये जातीय तणाव किंवा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. अकोला आणि संभाजीनगरमधील हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. यापैकी संभाजीनगरमध्ये पोलीस गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. नव्याने साताऱ्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याचा निर्णय झाला तेव्हापासूनच राज्यातील वातावरण बिघडू लागल्याचे निरीक्षण गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. रामनवमीच्या वेळी संभाजीनगर आणि मालाड मालवणीमधील मिरवणुकीवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट होता, असेही सांगण्यात येते. कोल्हापूरमध्ये गेल्या जूनमध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता. परंतु या जिल्ह्यात हा प्रकार घडण्यापूर्वी छोटे-मोठे अनेक प्रकार ग्रामीण भागात घडल्याचा आरोप तेव्हा झाला होता.

आणखी वाचा-एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात लोकसभेसाठी भाजप आग्रही?

राज्यात जातीय हिंसाचाराच्या घटनांची तेवढी पार्श्वभूमी नाही. तरीही गेल्या सहा महिन्यांत नऊ शहरांमध्ये झालेला जातीय हिंसाचार लक्षात घेता राज्यातील जातीय सलोखा बिघडू लागल्याचे लक्षण मानले जाते. गृह खात्याचे एक प्रकारे अपयश मानावे लागेल.

कोणत्या शहरात कधी संघर्ष झाला?

छत्रपती संभाजी नगर- (रामनवमी – ३१ मार्च )
रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक. पोलीस गोळीबारात एक जण ठार.

मुंबई – मालाड मालवणी- (रामनवमी – ३१ मार्च)
रामनवमी मिरवणुकीच्या वेळी मोठय़ाने ध्वनिक्षेपक लावण्यावरून वाद. ३०० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

जळगाव- पालधी – (रामनवमी – ३१ मार्च)
प्रार्थनास्थळासमोर मोठ्याने ध्वनिक्षेपक लावण्यावरून वाद.

अकोला (१३ मे)
समाज माध्यमातील पोस्टवरून दंगल. १ ठार, १० जखमी.

नगर -शेवगाव (१४ मे)
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवरून वाद. ३० जणांना अटक तर १५० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वर (१४ मे)
मंदिरासमोर संदल प्रथेवरून वाद. ४ जणांना अटक. विशेष चौकशी पथकाकडून चौकशीचा आदेश

संगमनेर (६ जून)
लव्ह जिहादच्या विरोधात निघालेला मोर्चा संपताच समनापूर गावात दगडफेक ’

कोल्हापूर (७ जून)
समाज माध्यमातील आक्षेपार्ह छायाचित्रांवरून गोंधळ, पोलिसांकडून बळाचा वापर.

सातारा (१० सप्टेंबर)
समाज माध्यमातील आक्षेपार्ह मजकुरावरून दंगल. १ ठार तर १० पेक्षा अधिक जखमी.