वरिष्ठ भाजपा नेते आणि त्रिपुरा ट्रायबल एरिया ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट कौन्सिलमधील विरोधी नेते हंगशा कुमार त्रिपुरा यांनी ट्रायबल कौन्सिलचे वर्चस्व असलेल्या तिपरा मोर्चात सहभाग दर्शवला असून ते म्हणाले, ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणजे निव्वळ शाब्दिक बुडबुडे आहेत. वास्तविक आदिवासी किंवा आदिवासी-एतर राज्यांत कोणताच परिणाम झालेला नाही. nढलाई जिल्ह्यातील माणिकपूरमध्ये मोठा प्रमुख प्रद्योत किशोर कार्यक्रमात सहभागी झाले होते. याचवेळी हंगशा कुमार त्रिपुरा हे देखील मोठात सामील झाले. हंगशा आपल्या ६,००० समर्थकांसह पक्षात दाखल असल्याचा मोठा पक्षाचा दावा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हंगशा यांनी भाजपाला दिलेल्या सोडचिठ्ठीवर बोलताना भाजपा मुख्य प्रवक्ता सुब्रतं चक्रवर्ती म्हणाले, “आम्ही शिस्तशीर कार्यकर्यांचा संघटीत पक्ष आहोत. एक किंवा काही कार्यकर्त्यांनी पक्ष बदलल्याने फारसा फरक पडत नाही. वैयक्तिक स्वार्थाकरिता काम करणाऱ्या लोकांचा आमच्या पक्षावर प्रभाव पडू शकत नाही किंवा हानी होऊ शकत नाही. आम्ही सर्वप्रथम राष्ट्राला समर्पित आहोत आणि त्यानंतर पक्षाला! भाजपा का सोडली हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे.”

राज्याच्या ट्रायबल कौन्सिलमध्ये विरोधी पक्षात असूनही, त्यांचा आदिवासी मित्रपक्ष इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरासोबत मिळून राज्य सरकार चालवत असलेल्या भाजपवर टीका करताना प्रद्योत म्हणाले, “२०१८ मध्ये जे घडले, त्याची २०२३ मध्ये पुनरावृत्ती होईल. कोणी कोणाला मदत करत नाही, कोणी काम करत नाही हे वास्तव आहे. आम्ही अगदी स्पष्ट आहोत, आम्हाला टिपरसासाठी घटनात्मक उपाय हवा आहे.”

एका घटनेत खोवाई जिल्ह्यातील मुंगाईकामी भागात गेलेल्या भाजपा जनजाति मोर्चाच्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्यात ते जखमी झाले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या त्रिपुरा दौऱ्याकरिता संघटनात्मक कार्यासाठी हे नेते दौऱ्यावर असून सदर हल्ला तिपरा मोठा कार्यकर्त्यांनी घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला. या हल्ल्यात भाजपाचे आदिवासी नेते बिकाश देबबर्मा, सुधा जामातिया आणि अन्य  दुखापतग्रस्त झाल्याचे समजते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In tripura bjp leaders join tipra morcha pkd