चंद्रशेखर बोबडे

नागपूर : एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे रोज माध्यमांशी बोलताना भाजप – शिवसेना (शिंदे) युतीत कुठलाही तणाव नाही,असा दावा करतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे माजी आमदार शिंदे गटाच्या विद्यमान आमदार, खासदारावर खरमरीत टीका करतात व व्यासपीठावर उपस्थित असूनही फडणवीस, बावनकुळे त्यांना थांबवत नाही. यावरून भाजपचे शिंदे गटासोबत सध्या ‘ मी मारल्या सारखे करतो तू रडल्या सारखे कर ‘ असे सुरू असल्याचे दिसून येते.

Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
chaturang article on revolutionary tone of Indian womens liberation
भारतीय स्त्रीमुक्तीचा क्रांतिकारी सूर
mahayuti dispute on guardian ministership
विश्लेषण : पालकमंत्रीपदावरून महायुतीत ठिणगी कशासाठी? भाजपवर शिंदे गट नाराज?
Badlapur Sexual Assault Case, Akshay Shinde Encounter Case, Akshay Shinde ,
भाजपच्या सांगण्यावरून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, माजी गृहमंत्र्यांचा थेट आरोप

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भाजपने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच अनुषंगाने पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रामटेके विधानसभा मतदारसंघांत पारशिवनी येथे भाजपचा मेळावा घेतला. या मेळाव्यात शिंदे गटाचे रामटेकेचे विद्यमान आमदार आशीष जयस्वाल व खासदार कृपाल तुमाने यांच्या उपस्थितीवर या भागाचे भाजपचे माजी आमदार डी.मल्लीकार्जून रेड्डी यांनी जाहिरपणे नापसंती व्यक्त केली. भाजपच्या मेळाव्यात जयस्वाल, तुमाने यांचे काम काय? भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बाजूला करून शिवसेना वाढवण्यासारखा हा प्रकार नाही का?, असा थेट सवालच रेड्डी यांनी केला.

हेही वाचा… शिॆदेंच्या जाहिरातींना भाजप कार्यकर्त्यांकडून फलकबाजीने प्रत्युत्तर; देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व सक्षम असल्याचे अधोरेखित

हेही वाचा… जमाखर्च : अब्दुल सत्तार, कृषिमंत्री; सरकारची ‘नामी – बदनामी’ करणारे मंत्री

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि शिंदे गटाशी भाजपच्या वाढत्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर रेड्डी यांची टीका महत्वपूर्ण मानली जाते. रामटेक लोकसभा आणि विधानसभा हे शिवसेनेचे गड मानले जातात. विभाजनामळे सेना कमजोर झाल्याची संधी साधून भाजपने येथे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच रेड्डी यांनी फडणवीस, बावनकुळे यांच्या समक्ष शिंदे गटाचे कान टोचले असावे, असे सांगितले जात आहे.

Story img Loader