वर्धा : नव्या राजकीय नेतृत्वास रोखण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील दोन राजकीय घराणी वैर विसरून एकत्र आल्याचे चित्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे आले आहे. गेल्या चार तपांपासून देशमुख व शेंडे हे मातब्बर राजकीय कुटुंब म्हणून विदर्भास सुपरिचित. सहकारमहर्षी बापुरावजी देशमुख यांनी सहकारचा पाया जिल्ह्यात रचतानाच काँग्रेसचे बेरजेचे राजकारण केले होते. ते आमदार व राज्यसभेचे खासदार होते. त्याच काळात भाऊसाहेब शेंडे हे देशमुखविरोधी गटाचा मोर्चा सांभाळत. पुढे बापुरावजी यांचे पुत्र प्रा. सुरेश देशमुख यांनी या गटाची धुरा सांभाळली, तर भाऊसाहेब यांचे पुत्र प्रमोद शेंडे यांनी राजकारण गाजविले. पाच वेळा आमदार राहिलेल्या शेंडें विधानसभेचे उपाध्यक्षही होते. पुढे शेंडेंच्या तिसऱ्या पिढीतील शेखर शेंडे व देशमुखांच्या तिसऱ्या पिढीचे समीर देशमुख यांनी गटाची सूत्रे हाती घेतली. शेखर यांचा पदार्पणातील विधानसभा निवडणुकीत प्रा. सुरेश देशमुख यांनी पराभव केला. किमान वर्धा विधानसभा क्षेत्रात शेंडे आघाडीवर तर सहकारात देशमुख यांचे वर्चस्व होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता हे दोन्ही घराणे आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत आहेत. शेखर शेंडे तीनदा तर समीर देवळीत एकदा पराभूत झाले आहे. विधानसभेत पोहचण्याची यांची धडपड सर्वविदित आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत हेच दोन गट दरारा राखून असताना नवे राजकीय नेतृत्व उभे झाले आणि यांना ओहोटी लागली. प्रथम कसलीच राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या डॉ. पंकज भोयर यांनी दोनदा शेंडेंचा पराभव करून स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित केले . भोयर हे शेंडेंपेक्षा देशमुख गटास अधिक त्रासदायक ठरले आहेत.. म्हणून भोयर यांना मात देण्यासाठी शेखर, समीर एकत्र आल्याच्या घडामोडी आहेत.

हेही वाचा :कारण राजकारण: ‘मातोश्री’च्या अंगणात जागावाटपाचे त्रांगडे

तसेच आणखी एक नेतृत्व शेंडे यांच्या राजकीय वाटचालीवर ‘ब्रेक’ लावेल, अशी शक्यता व्यक्त होते. प्र डॉ. सचिन पावडे यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न चालविले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व अन्य नेत्यांची भेट घेतल्याचे ते सांगतात. काँग्रेस अंतर्गत तिकीटवर दावा करणारा नेता शेंडे यांना पक्षात विरोधक म्हणून लाभला. भोयर व पावडे यांचे नेतृत्व मोठे आव्हान म्हणून देशमुख-शेंडेंपुढे उभे झाले आहे.

हेही वाचा : काकांचा पत्ता कापून अखिलेश यादवांनी ब्राम्हण नेत्याला दिले विरोधी पक्षनेतेपद; कोण आहेत माता प्रसाद पांडे?

राजकीय परंपरांविरोधात जनतेतून आलेले, असा सामना येथे आहे. याच पार्श्वभूमीवर शेंडे-देशमुख यांच्या मनोमिलनाचे चित्र उघड होत आहे. माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्या सत्कार कार्यक्रमात सर्वप्रथम तर नंतर विविध ठिकाणी शेखर, समीर यांची मैत्री दिसून आली. गेल्या आठवड्यात देशमुखांच्या संस्थेत पाहुणपण लाभलेल्या शेखर यांना अन्य व्यासपीठावर समीर यांची संगत लाभली. हे सहज होत नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. दोघांकडून उघड भाष्य होत नाही, मात्र भोयर व पावडे यांची घोडदौड रोखण्यासाठी शेंडे व देशमुख मैत्री आणखी घट्ट होणार असल्याचे बोलल्या जाते.