प्रशांत देशमुख

वर्धा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वर्धा जिल्हा दौऱ्यानिमित्त पक्षांतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली. पक्षाची ताकद आधीच मर्यादित त्यात गटबाजी हे सारे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविणारेच आहे.

trouble for Mahayuti and Mahavikas Aghadi Because of the rebels in thane district
बंडखोरांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nana suryavanshi bjp
“त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी
Loksatta anvyarth Ten elephants died in the Bandhavgarh tiger project in Madhya Pradesh
अन्वयार्थ: हत्तीएवढ्या दुर्लक्षाचे बळी
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा
gadchiroli vidhan sabha election 2024
गडचिरोलीत आत्राम, गेडाम, मडावी बंडखोरीवर ठाम, होळी, कोवासे, कोवे माघार घेण्याची शक्यता?
belgaon black day marathi news
सीमा भागात काळा दिन; बेळगावात फेरीला प्रतिसाद
Residents living in Phadke road area suffered due to this noise during festivals
डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील डीजे, ढोलताशांच्या दणदणाटाने रहिवासी हैराण

शरद पवार यांच्या उपस्थिततीत जिल्ह्यात प्रथमच पक्षाला गटबाजीचा फटका बसला. पक्षाच्या स्थापनेपासून माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख हेच पक्षाचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा राहले आहे. देशमुख बाेले, पक्ष चाले अशी स्थिती पक्षात असताना गत काही वर्षात नवे पाहुणे पक्षात आले. त्यामुळे सहकार गट अर्थातच अस्वस्थ झाल्याची चर्चा सुरू झाली. माजी खासदार सुबोध मोहिते हे पक्षातील बडे पाहुणे अस्वस्थतेत भर टाकणारेच ठरले. त्यांनी पवारांच्या ठरलेल्या वर्धा दौऱ्यात स्वत:च्या आयोजनात दोन राजकीय कार्यक्रम पक्के केल्यानंतर खळखळ सुरू झाली. हे कार्यक्रम रद्द करण्याचे प्रयत्न सुध्दा झाल्याची कुजबूज मोहिते गटाकडून सुरू होती. परंतु मोहिते यांनी सर्व गटांना सोबत घेवून कार्यक्रम यशस्वी करण्याची भूमिका घेतली. त्यात सहकार्य करण्याची विनंती केली. सभेपूरते एकत्र आलेले सर्व नेते मात्र नंतर दुरावल्याने मोहिते यांनी प्रचार फलकावरील स्वत:चीच छबी अधिक मोठी केली. हे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या गटबाजीचे जाहीर प्रत्यंतर ठरले. पवारांच्या उपस्थितीत बोलताना माेहिते यांनी खात्री दिली की कुणाच्याही भावना न दुखावता काम करणार. वाद असतातच. ते संघटनेच्या जीवंतपणाचे लक्षण होय. वर्धेत काही करावे ही भावना असल्याचे मोहिते बोलून गेले. तर प्रा.सुरेश देशमुख यांनी नव्याजुन्यांचा वाद नसल्याचे स्पष्ट करीत नव्यांचे स्वागतच असल्याचे नमूद केले. नव्याने आलेले अतुल वांदिले म्हणाले की पक्षात येणाऱ्यांना समजून घ्या. सोबत घ्या. तर खुद्द अनिल देशमुख यांनी पक्षासाठी एकजुटीने काम करण्याचा सल्ला दिला. व्यासपीठावरील ही जाहीर वक्तव्ये गटबाजीच्या चर्चेला दुजोराच समजावी.

हेही वाचा… गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजप आमदाराचा दारुण पराभव

हेही वाचा… मंत्रिमंडळ विस्तार आणि निवडणुका लांबणीवर पडल्याने सांगलीत राजकीय खडाखडी

आगामी निवडणुकीत जिल्ह्यात आर्वी व हिंगणघाट हे दोन विधानसभा क्षेत्र तसेच वर्धा लोकसभा क्षेत्रात पक्षाने उमेदवार देण्याचा आग्रह झाला. मोहिते यांनी किमान व्यासपिठावर एकजुटीचे दर्शन घडविण्यात यश साधले. मात्र पुढे काय, ही शंका निर्माण करणारी ही निर्धार सभा ठरली. सुबोध मोहितेंच्या पाठीशी विदर्भातील पक्षाचा बडा नेता असल्याचे व त्यानेच दौरा पक्का केल्याचे ऐकायला मिळाले. पक्षातील प्रा.देशमुख, किशोर माथनकर, ॲड.सुधीर कोठारी, राजु तिमांडे, अभिजीत फाळके या खेरीज आता मोहिते या नावाची भर पडली आहे. ते वर्धा लोकसभा क्षेत्रातून लढण्यास इच्छुक आहे. पण पक्षातील त्यांचे नवखेपण अनेकांना बोचते. पक्ष स्थापनेपासून पवारांसोबत असल्याचा अभिमान बाळगणारे मोहिते यांची वाटचाल सुखनैव होऊ देतील काय, हाच खरा प्रश्न आहे. . विद्यमान नेतृत्वाविषयी सतत चुकीची माहिती मोहिते यांनी वरिष्ठांना दिल्याचा आरोप होतो. त्यामुळे व्यासपिठावरील मनोमिलन शंकास्पद ठरत आहे. पक्षाचे विविध गट स्वत:च्या अस्तित्वासाठी यापुढे अधिक प्रखरतेने कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील, अशी टिप्पणी होते.