यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिल्ह्यात पाच उमेदवार जाहीर केले. यापैकी तीन जागेवर भाजपने तर आज पुसद येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (शिंदे) पक्षाने आपले उमदेवार जाहीर केले. महाविकास आघाडीचे अद्यापही काही ठरले नाही. दिग्रस आणि पुसद हे दोन्ही बंजाराबहुल मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीने बंजारा समाजाचा उमदेवार दिल्यास समीकरणे बदलतील.

शिवसेना (शिंदे) ने विद्यमान मंत्री संजय राठोड यांना दिग्रस विधानसभा मतदारसंघातून तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)ने पुसद विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांना उमेदवारी दिली. दिग्रसमध्ये महायुतीकडून शिवसेनेचे संजय राठोड हे एकमेव दावेदार होते. पुसदमध्ये मात्र इंद्रनील नाईक यांच्यासह अनेकजण इच्छुक होते. दिग्रसमध्ये गेल्या २० वर्षांपासून संजय राठोड यांचे वर्चस्व कायम आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत दिग्रस मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारास आठ हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे संजय राठोड यांना बंजारा समाजाची साथ असली तरी महाविकास आघाडीकडून त्यांच्या विरोधात कोण निवडणूक लढणार यावर येथील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Raju Todsam, Kisan Wankhede
आर्णी व उमरखेडमध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना डच्चू; रिपाईं (आ)चेही स्वप्न भंगले
mla Indranil Naik yayati naik
पुसद मतदारसंघासाठी ‘बंगल्यात’च रस्सीखेच; थोरले की धाकटे? नाईक कुटुंबात पेच
yavatmal vidhan sabha
यवतमाळ मतदारसंघ : प्रत्येकी नऊ वेळा अल्पसंख्याक व कुणबी उमेदवारास संधी
Challenges to Manikrao Thackeray in Digras Constituency in Assembly Elections
राज्याच्या राजकारणात वजन असलेल्या माणिकराव ठाकरे यांच्यापुढे दिग्रस मतदारसंघात आव्हानांचे डोंगर
NCP Sharad Pawar Third Candidate List
NCP Sharad Pawar Third Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात दिला ‘हा’ तगडा उमेदवार

हेही वाचा : झारखंड विधानसभा निवडणूक : उमेदवार यादी जाहीर होताच भाजपाच्या १२ हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; पक्षावर घराणेशाहीचा आरोप

येथील जागा काँग्रेस आणि शिवसेना उबाठाने मागितली आहे. येथून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे हे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. येथून माणिकराव ठाकरे यांनी स्वत: निवडणूक लढावी, अशी इच्छा काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र माणिकराव ठाकरे हे मुलासाठी आग्रही आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी दारव्हा येथे सकल कुणबी समाजाने सभा घेवून संजय राठोड यांना समर्थन दिल्याने ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेना उबाठाला सोडून येथून विद्यमान खासदार संजय देशमुख यांना उमेदवारी द्यावी, असा एक मतप्रवाह आहे. याबाबत महाविकास आघाडीत अद्यापही निर्णय झाला नव्हता.

हेही वाचा : Sonam Wangchuck : सोनम वांगचूक यांचे उपोषण मागे; लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणार?

नाईक घराण्याचे वर्चस्व असलेल्या पुसदमध्ये बंजारा समाजाचा उमेदवार सर्वाधिक वेळा निवडून आला. महायुतीने येथे इंद्रनील नाईक यांना रिंगणात उतरविल्याने त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे नाईक कुटुंबातीलच व्यक्ती रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते मनोहर नाईक यांचे थोरले चिरंजीव ययाती नाईक यांनी थेट शरद पवार यांची भेट घेवून पुसदमध्ये उमेदवारी मागितली आहे. यावर शरद पवार यांनी काहीही भाष्य केले नव्हते. आता महायुतीने उमदेवार जाहीर केल्याने शरद पवार हे ययाती नाईक यांनाच उमेदवारी देतील, अशी अटकळ आहे. या मतदारसंघातील जातीय समीकरणांचा विचार झाल्यास महाविकास आघाडी बंजारा समाजाचाच उमदेवार देण्याची चिन्हं आहेत. ययाती नाईक यांना उमेदवारी देवून बंजारा नाईक कुटुंबीय आणि येथील पंरपरागत बंजारा मतदारांसमोर पेच निर्माण करण्याचा खेळी महाविकास आघाडी खेळेल, अशी चर्चा आहे.

Story img Loader