इंदापूर

इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतरामुळे गाजलेल्या इंदापूर मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होत आहे. लागोपाठ दोन पराभवांनंतर यंदा कोणत्याही परिस्थितीत बाजी मारायचीच, या निर्धाराने पाटील रिंगणात उतरले आहेत. असे असले तरी मतदारसंघातील नाराजी, नातेवाईकांनी सोडलेली साथ आणि एकवटलेले विरोधक या साऱ्यांवर मात करण्याचे मोठे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे.

Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
gulabrao deokar loksatta news
शरद पवार यांचे निष्ठावंत गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार, सोमवारी भेट
cool motherhood for new generation children
इतिश्री : कूल मॉमगिरी
Priyanka Gandhi Parliament on Jai Shri Ram Video Viral
Priyanka Gandhi: “जय श्रीराम नाही, तर…”, प्रियांका गांधींनी महिला खासदारांना असा सल्ला का दिला? व्हिडीओ व्हायरल
pratap jadhav
“आमदार गायकवाड यांच्या आरोपात तथ्य, पंख छाटण्याचा हा प्रकार…”, ‘या’ नेत्याची खासदार व आमदाराच्या वादात उडी

बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार असली, तरी खरी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशीच होणार आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागल्याचे चित्र आहे. विद्यामान आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात खरी लढत असणार आहे, तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे बंडखोर, सोनाई उद्याोगसमूहाचे संचालक प्रवीण माने यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

इंदापूरमध्ये २०१४ ला काँग्रेस तर २०१९ मध्ये भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. यंदा पाटील हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. गेल्या दहा वर्षांत तीन पक्षांतून निवडणूक लढविणाऱ्या पाटील यांच्यासमोर आव्हाने मोठी आहेत. २०१९ मध्ये शरद पवारांची जादू या मतदारसंघात चालली आणि भरणे यांना विजय मिळाला. यंदा शरद पवार यांची या भागातील ताकद हर्षवर्धन पाटील यांना फायदेशीर ठरते का, याची उत्सुकता आहे.

कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला

महायुतीमध्ये इंदापूर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे जाणार असल्याने नाराज झालेल्या हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश होताच पाटील इंदापूरचे उमेदवार असतील, अशी घोषणा पवार यांनी केली. त्यामुळे पक्षातील नाराजी उफाळून आली. सोनाई उद्याोगसमूहाचे संचालक प्रवीण माने यांच्यासह पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी बंडाचा पवित्रा घेतला.

निर्णायक मुद्दे

● लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना या मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकत पाटील यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

● दत्तात्रय भरणे यांना विविध समाजघटकांनी पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील पाटील यांच्याविरोधातील नाराजीही भरणे यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. अपक्ष प्रवीण माने कोणत्या राष्ट्रवादीची मते घेणार, यावरही विजयाची गणिते निश्चित होणार आहेत.

लोकसभेतील राजकीय चित्र

महाविकास आघाडी – १,१४,०२०

महायुती – ८८,०६९

Story img Loader