मुंबई : महायुतीकडून ‘दशसूत्री’ची घोषणा मंगळवारी झाल्यानंतर श्रेयवादामुळे तीनही पक्षांचे स्वतंत्र जाहीरनामे घोषित करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) बुधवारी स्वतंत्र जाहीरनामा घोषित केला असून, शिवसेना (एकनाथ शिंदे) एक-दोन दिवसांत जाहीरनामा घोषित करणार आहे. भाजपमध्ये अजून जाहीरनाम्यासाठी बैठकांचे सत्र सुरू असून, १० किंवा ११ नोव्हेंबरला जाहीरनामा घोषित करण्याची तयारी सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे मंगळवारी झालेल्या महायुतीच्या प्रचारसभेत निवडून आल्यानंतर सरकार काय करणार, याची ‘दशसूत्री’ जाहीर केली. त्यानुसार ‘लाडकी बहीण’ योजनेचे मानधन दरमहा दीड हजार रुपयांवरून २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी व वार्षिक १५ हजार रुपये, ४५ हजार गावांमध्ये रस्ते, २५ हजार महिला पोलिसांची भरती, २५ लाख रोजगारनिर्मिती, अंगणवाडी, आशा सेविकांना दरमहा १५ हजार रुपये वेतन, वीजबिलात ३० टक्के कपात, जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार, वृद्धांना दरमहा २१०० रुपये मानधन, ‘व्हिजन महाराष्ट्र’चा आराखडा १०० दिवसांत अशा घोषणा शिंदेंकडून करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>नंदूरबार जिल्हा ‘गावित’मय, एकाच घरातील चार सदस्य विविध पक्षातून विधानसभेच्या रिंगणात; तीन दशकांत ‘अशी’ मिळवली पकड

शिवसेना शिंदे गटाच्या ‘दशसूत्री’नंतर आता अजित पवार गटाने बुधवारी स्वतंत्र जाहीरनामा घोषित करून ‘दशसूत्री’व्यतिरिक्त अडीच लाख नोकऱ्या, तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये बोनस, एक लाख विद्यार्थ्यांना दरमहा १५ हजार रुपये ‘पाठ्यवेतन’, अशा घोषणा केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख किंवा छायाचित्रे नाहीत.

सरकार आल्यास कोणकोणत्या आश्वासनाची पूर्तता?

भाजपमध्ये जाहीरनामा समितीच्या काही बैठका झाल्या असून चर्चा सुरू आहे. लवकरच तो घोषित केला जाईल, असे निवडणूक माध्यम प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. महायुतीतील तीनही पक्षांची मतदारांवर आश्वासनांची खैरात करण्यासाठी आणि श्रेयासाठी चढाओढ सुरू आहे. त्यामुळे संयुक्त जाहीरनामा किंवा ‘दशसूत्री’व्यतिरिक्त तीनही पक्षांकडून स्वतंत्र जाहीरनामे घोषित होत आहेत. त्यामुळे महायुती सरकार आल्यास कोणत्या पक्षाच्या आश्वासनांची पूर्तता होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

हेही वाचा >>>Constituencies In Yavatmal District : यवतमाळ जिल्ह्यात जातीय समीकरणेच ठरणार निर्णायक

शिंदे गटाचा आज किंवा उद्या जाहीरनामा

शिवसेना शिंदे गटाकडूनही स्वतंत्र जाहीरनामा गुरुवारी किंवा शुक्रवारी जाहीर केला जाईल, असे वरिष्ठ नेत्याने सांगितले. सत्ता आल्यास लाडकी बहीण योजनेचे मानधन दीड हजार रुपयांवरुन दुप्पट करण्याची घोषणा शिंदे यांनी एक-दीड महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या सभेत केली होती. आता शिवसेनेच्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेतील मासिक मानधन तीन हजार रुपये की २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले जाणार, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.