चंद्रपूर : अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेला तर तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार, असे स्पष्ट संकेत अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे.

जोरगेवार कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कालपर्यंत महायुती समर्थक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आमदार, अशी ओळख असलेल्या जोरगेवार यांच्यासाठी भाजप प्रवेश अडचणीचा ठरला. ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार समर्थकांनी यास कडाडून विरोध केला. जोरगेवार यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यास सामूहिक राजीनामे देऊ, असा आक्रमक पवित्रा स्थानिक नेत्यांनी घेतला. भाजपकडून माजी सभापती तथा मुनगंटीवार समर्थक ब्रिजभूषण पाझारे यांचे नाव या जागेसाठी समोर केल्या जात आहे.

Argument between supporters of MP Namdev Kirsan and MLA Sahesram Koreti
काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत गोंधळ; पर्यवेक्षकासमोरच खासदार-आमदार समर्थक भिडले
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
srijaya Chavan
आजीकडून पायपीट, नातीसाठी वाहनांचा ताफा !
sharad pawar s new strategy for Baramati
‘बारामती’साठी शरद पवारांची नवी खेळी? इच्छुकांच्या मुलाखतीसाठी युगेंद्र पवार आलेच नाहीत
Satyasheel Sherkar of Congress is the candidate of NCP Sharad Pawar party in Junnar
जुन्नरमध्ये काँग्रेसचे सत्यशील शेरकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार ?
Yuva Sena office bearer, Shinde group,
शिंदे गटातील युवा सेना पदाधिकाऱ्यासह अनेक नगरसेवकांचा रविवारी ठाकरे गटात प्रवेश?
Challenging for Ajit Pawar in Pimpri Chinchwad Assembly elections 2024
पिंपरी-चिंचवडवरील अजित पवारांची पकड सैल?
Bhosari Vidhan Sabha, Vilas Lande, Sharad Pawar group,
भोसरी विधानसभा: विलास लांडेंचं ठरलं; या दिवशी करणार शरद पवार गटात प्रवेश; मुलानेच दिली माहिती

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : गडचिरोलीत राजकीय पक्षांपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान?

जोरगेवार शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढण्यास तयार नाहीत. एकतर ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला सुटणार नाही आणि सुटलीच तर शिंदे गटाकडे चंद्रपूर शहरात कार्यकर्त्यांची ताकद नाही, अशी कारणे ते यासाठी देतात.

महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या पारड्यात जाणार, अशी सध्याची स्थिती आहे. काँग्रेसने यापूर्वीच जोरगेवार यांना नकार कळवला आहे. काँग्रेसला या जागेवर हिंदू दलित उमेदवार द्यायचा नाही.

हेही वाचा >>> Maharashtra Election 2024 : सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादीत वर्चस्वावरून चढाओढ

अशा परिस्थितीत अपक्ष निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नसलेल्या जोरगेवार यांना शरद पवार गटाने प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडीत ही जागा आपल्याकडे घ्यायची आणि जोरगेवार यांना तुतारी चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवायचे, असा शरद पवार गटाचा विचार असल्याचे दिसते आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसे संकेत यापूर्वीच दिले आहे. पाटील आणि जोरगेवार यांच्यात बोलणेदेखील झाले आहे. जोरगेवार यांनी होकारही दर्शविला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते शरद पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

विजय वडेट्टीवार यांचे प्रयत्न सुरूच

आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूरची जागा शरद पवार गटाकडे गेली तर तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार, असे यापूर्वीच सांगितले आहे. दुसरीकडे, काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून जोरगेवार यांना नकार कळवण्यात आलेला असतानाही विजय वडेट्टीवार त्यांच्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जोरगेवार यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा आहे.