चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत १२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये अपक्षांची संख्या अधिक असून ‘उदंड जाहले अपक्ष’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. हे अपक्ष उमेदवारी कोणाचे राजकीय गणित बिघडवणा आणि कोणासाठी लाभदायक ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजूरा मतदारसंघात १७ उमेदवार आहेत. यामध्ये प्रिया बंडू खाडे, निनाद चंद्रशेखर बोरकर, संजय यादवराव धोटे, चित्रलेखा कालिदास धंदरे, सुदर्शन भगवानराव निमकर, प्रवीण रामराव कुमरे, रेश्मा गणपत चव्हाण, भूषण मधूकर फुसे, प्रवीण रामदास सातपाडे, मंगेश हिरामन गेडाम, किरण गंगाधर गेडाम, अभय मारोती डोंगरे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. चंद्रपूर मतदारसंघात १७ उमेदवारांमधून सुरेश मल्हारी पाईकराव, नभा संदीप वाघमारे, राजेश भीमराव घुटके, प्रियदर्शन अजय इंगळे, मिलिंद प्रल्हाद दहिवले, ज्ञानेश्वर एकनाथ नगराळे, भानेश राजम मातंगी, विनोद कवडूजी खोब्रागडे, प्रकाश शंकर रामटेके, मनोज गोपीचंद लाडे, प्रकाश उद्धवराव ताकसांडे, ब्रिजभूषण महादेव पाझारे, राजू चिन्नय्या झोडे, आनंद सुरेशराव इंगळे आणि रतन प्रल्हाद गायकवाड अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.

आणखी वाचा-“उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा

बल्लारपूर मतदारसंघात २७ उमेदवार आहेत. किशोर बंडू उइके, संजय निलकंठ गावंडे, रामराव ओंकार चव्हाण, निशा शितलकुमार धोंगडे, राजु देविदास जांभुळे, सतीश मुरलीधर मालेकर, कुणाल पुरूषोत्‍तम गायकवाड, अभिलाषा राकेश गावतुरे, प्रकाश मुरलीधर पाटील, रब्बानी याकुब सय्यद, संजय मारोतराव घाटे, गावतुरे छाया बंडू, गावतुरे अनीता सुधाकर, नरेन्द्र शंकर सोनारकर, सचिन राजबहुरण रावत, राकेश नामदेवराव गावतुरे, सैय्यद अफजल अली सैय्यद आबिद अली, संदिप अनिल गिऱ्हे, विरेंद्र भीमराव कांबळे अपक्ष आहेत.

आणखी वाचा-बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात अपक्षांची ‘पेरणी’!

ब्रम्हपुरी मतदारसंघात १७ उमेदवार आहेत. यामध्ये विनोद नावघडे, वसंत वर्जुरकर, गुरुदेव भोपये, सुधाकर श्रीराम, रमेश मडावी, रमेश समर्थ , प्रेमलाळ मेश्राम अपक्ष आहेत. चिमूर मतदारसंघात अरविंद आत्माराम सांदेकर, अनिल अंबादास धोंगडे, हेमंत गजानन दांडेकर, धनराज रघुनाथ मुंगले, कैलास श्रीहरी बोरकर, योगेश नामदेवराव गोन्नाडे, ॲड. हेमंत सुखदेव उरकुडे, मडावी मनोज उद्धवराव, रमेश बाबुराव पचारे, जितेंद्र मुरलीधर ठोंबरे, केशव सिताराम रामटेके अपक्ष आहेत. वरोरा मतदारसंघात विनोद कवडूजी खोब्रागडे, अमोल दिलीप बावणे, राजू मारोती गायकवाड, जयंत मोरेश्वर टेमुडे, श्याम सदाकत अली, श्रीकृष्ण धुमदेव दडमल, रंजना मनोहर पारशिवे, मुकेश मनोज जीवतोडे, चेतन गजानन खुटेमाटे, महेश पंढरीनाथ ठेंगणे, मुनेश्वर बापूराव बदखल, रमेश महादेवराव राजुरकर, प्रवीण मनोहर खैरे, नरेंद्र नानाजी जीवतोडे, सुभाष जगन्नाथ ठेंगणे, अतुल ईश्वर वानकर, तारा महादेवराव काळे यांचा अपक्ष उमेदावारांमध्ये समावेश आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independents candidates in six constituencies of chandrapur will spoil party candidates votes in vidhan sabha election 2024 print politics news mrj