काश्मीरमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील सहकारी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) यांच्यामध्ये पुरेसं सामंजस्य निर्माण होऊ न शकल्याने रविवारी त्यांनी तीनही जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. एनसीने या मतदारसंघामध्ये उमेदवार दिल्यानंतर एका आठवड्यानंतर पीडीपीनेही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पीडीपी खरे तर कमीत कमी एका जागेसाठी आग्रही होती. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात आता काँग्रेस नेमकी कुणाची पाठराखण करणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून उभ्या आहेत, तर पक्षाचे तरुण नेते वाहीद उर रहमान पारा हे श्रीनगरमधून उभे आहेत. पीडीपीने फयाज अहदम मीर यांना बारामुल्लामधून उमेदवारी दिली आहे. ते अलीकडेच पक्षात परतले असून राज्यसभेचे माजी खासदार आहेत.

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?

आपली उमेदवारी जाहीर करताना मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, “मी अनंतनागमधून एखादा तरुण उमेदवार दिला असता, पण दिल्लीने आपली सगळी ताकद दक्षिण काश्मीरमध्ये लावली आहे. मी एक योद्धा असून हे आव्हान स्वीकारते आहे. मी सर्व काश्मिरी, गुज्जर आणि पहाडी बांधवांना तसेच शिख आणि हिंदू बांधवांनाही असे आवाहन करते की, त्यांनी अशाच आवाजाला संसदेत पाठवावे, जो निर्भयपणे त्यांचं प्रतिनिधित्व करेल.”

पीडीपी जम्मूमध्ये काँग्रेसला समर्थन देईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. एनसीसोबत युती करण्याची आमची इच्छा होती. मात्र, त्यांच्या नेत्यांनी सार्वजनिकरित्या पीडीपीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने आम्हाला एकटेच चालावे लागते आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या की, “आम्ही हा निर्णय फारुक अब्दुल्ला यांच्यावर सोपवला आहे. त्यांनी सगळ्या जागांवर निवडणूक लढवली तरी त्याला आमची काहीच हरकत नाही, मात्र त्यांनी किमान एकदा आमच्याशी सल्लामसलत करायला हवी होती. विधानसभेच्या निवडणुकीसाठी युतीचा निर्णय घेण्याआधी ते लोकसभा निवडणुकीतील आमचे वर्तन पाहतील, असे म्हणून त्यांनी आमच्या पक्षाला आणि कार्यकर्त्यांना कमी लेखू नये.”

काँग्रेसच्या जाहीरनाम्याला ‘मुस्लीम लीगचा जाहीरनामा’ असे म्हटल्याबद्दल मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. त्या म्हणल्या की, एकीकडे काँग्रेससारखा जुना पक्ष नोकरी, शेतकऱ्यांचं कल्याण आणि युवकांना भत्ता देण्याची भाषा करतो आहे, तर भाजपा मात्र ‘पाकिस्तानचाच पुनरुच्चार’ करण्यात व्यस्त आहे; कारण त्यांच्याकडे दुसरं काही बोलण्यासारखे नाही.

हेही वाचा :  ममतादीदींच्या भाच्यासमोर कोणाचं आव्हान? डायमंड हार्बर कोण जिंकणार?

पीडीपीने दिलेले तीन उमेदवार कोणते आहेत?

मेहबुबा मुफ्ती
पीडीपीला एकत्र आणणारा घटक म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती होय. याआधी राज्याचा दर्जा असणाऱ्या काश्मीरच्या त्या एकमेव महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत. त्यांना माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सय्यद यांचा राजकीय वारसा लाभला आहे.

पीडीपीच्या प्रमुख असलेल्या मेहबुबा मुफ्ती यांनी आपली राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू केली. त्या १९९६ मध्ये पहिल्यांदाच दक्षिण काश्मीरमधील बीजबेहरामधून आमदार म्हणून निवडून आल्या. १९८७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर खोऱ्यातील ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणावर अपहाराचे आरोप झाले होते.

वडिलांच्या बरोबरीने काँग्रेस पक्षाला रामराम केला आणि पीडीपीमध्ये प्रवेश केला. त्यांचा ‘सौम्य अलिप्ततावाद’ आणि जनसंपर्क यामुळे विशेषत: दक्षिण काश्मीरमध्ये त्यांना लोकांकडून चांगल्या प्रकारे स्वीकारार्हता मिळाली.

जेव्हा २००२ मध्ये पीडीपी पहिल्यांदा सत्तेत आला, तेव्हा मेहबुबा या पहलगाममधून आमदार म्हणून निवडल्या गेल्या होत्या. २००४ मध्ये त्या अनंतनागमधून संसदेत गेल्या. त्यानंतर चार वर्षांनी झालेली विधानसभेची निवडणूक त्यांनी शोपियांमधील वाचीमधून जिंकली.

२००९ मध्ये मेहबुबा मुफ्ती यांनी पीडीपीमध्ये आपल्या वडिलांची जागा घेत नेतृत्व स्वीकारले. त्यानंतर पाच वर्षांनी त्या पुन्हा अनंतनागमधून संसदेत गेल्या. २०१६ मध्ये त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सय्यद यांचे भाजपासोबतच्या युती सरकारमध्ये मुख्यमंत्री असतानाच निधन झाले. त्यानंतर त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सत्तेच्या केंद्रस्थानी आल्या.

मुख्यमंत्री असताना मेहबुबा यांनी कठुआ प्रकरणादरम्यान भाजपाच्या मंत्र्यांविरोधात आपला बालेकिल्ला राखला होता. २०१८ मध्ये भाजपाने सरकारमधून आपला पाठिंबा काढून घेतल्यानंतर नागरिकांच्या हत्येचे प्रमाण वाढले होते, तेव्हा त्यांची लोकप्रियतादेखील सर्वाधिक घटली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, त्यांनी अनंतनागमधून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना यश मिळालं नाही; शिवाय त्या मतमोजणीत तिसऱ्या स्थानी गेल्या.

दक्षिण काश्मीरमधील बिजबेहारामधील रहिवासी असलेल्या मेहबुबा मुफ्ती या अनंतनागमधील निवडणुकीच्या रिंगणातील एकमेव स्थानिक उमेदवार आहेत. पीडीपीची सर्वोत्तम दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मुफ्ती यांच्या दावेदारीमुळे आता या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (DPAP) कडून गुलाम नबी आझाद, तर एनसीकडून गुज्जर नेते असलेले मियां अल्ताफ हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. भाजपाने अद्याप या जागेवर आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. ते गुलाम नबी आझाद यांनाच पाठिंबा देण्याची शक्यता अधिक आहे.

वाहिद उर रहमान पारा
वाहिद उर रहमान पारा यांचे आजोबा हे मोहम्मद मुफ्ती सय्यद यांचे जवळचे सहकारी होते. त्यांच्या माध्यमातूनच वाहिद उर रहमान पारा राजकारणात आले. त्यांनी २०१३ मध्ये अधिकृतरित्या पीडीपीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते लगेचच युवा अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले.

२०२२ मध्ये झालेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा परिणाम म्हणून त्यांच्या उमेदवारीकडे पाहिलं जात आहे. कारण यानंतरच दक्षिण काश्मीरमधील सहा विधानसभेचे विभाग हे श्रीनगर लोकसभेच्या जागेचा भाग बनले आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये पारा यांचा प्रभाव आहे.

त्यांच्याकडे संघटनात्मक कौशल्य चांगली आहेत. काश्मीरच्या खोऱ्यात तरुणांना चांगले उपक्रम दिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचं जाहीर कौतुकही केलं होतं. कलम ३७० रद्दबातल ठरवल्यानंतर आणि जिल्हा विकास परिषदेच्या (DDC) निवडणुकीमध्ये आपले नामांकन भरल्यानंतर पारा यांना राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA) अटक करण्यात आली होती. दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तुरुंगात असतानाच त्यांनी पुलवामामधून निवडणूक जिंकली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर आणि न्यायालयाचे आदेश असतानाही पारा यांना डीडीसीच्या सदस्यत्वाची शपथ घेऊ दिली नव्हती. दक्षिण काश्मीरमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.

पारा हे श्रीनगरमधून उमेदवार आहेत. या ठिकाणाहून ते एनसीचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्याविरोधात लढत देणार आहेत. मेहबुबा मुफ्ती यांनी त्यांच्याबद्दल म्हटले आहे की, “काश्मीरचा तरुण विशेषत: २०१९ पासून काय झेलतो आहे आणि काय सहन करतो आहे, याचे उदाहरण म्हणून पारा यांच्याकडे पाहता येईल. त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांचा छळही करण्यात आला. त्यांच्या वडिलांना कर्करोगाचे निदान झाले, मात्र पारा यांना वडिलांना भेटण्याचीही परवानगी देण्यात आली नाही.”

हेही वाचा : “रामाच्या नावाचा वापर ही लांच्छनास्पद बाब; भाजपाला रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवीय”; काँग्रेस नेते गौरव गोगोईंचा भाजपावर आरोप

फयाज अहमद मीर
फयाज (४७) हे २०१४ मध्ये कुपवारामधून विधानसभेची निवडणूक हरले होते. निव्वळ १३३ मतांनी पीपल्स कॉन्फरन्सच्या बशीर अहमद दार यांनी त्यांचा पराभव केला होता. २०१५ मध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर कलम ३७० रद्द केल्यानंतर पीडीपीसोबतचे त्यांचे संबंध कटू होत गेले.

त्यानंतर त्यांची हकालपट्टी झाली आणि त्यांनी पीपल्स कॉन्फरन्समध्ये प्रवेश केला. कुपवारामध्ये या पक्षाचं प्राबल्य आहे. २०२३ मध्ये पक्षामध्ये उलथापालथ झाल्यानंतर ‘कौटुंबिक कारणांचा’ दाखला देत त्यांनी पक्ष सोडला.

त्यानंतर ते मार्चमध्ये पुन्हा पीडीपीमध्ये परतले. २०१९ मध्ये पक्षाला ज्या जागेवर चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती, त्या ठिकाणीच ते उमेदवार म्हणून उभे आहेत. मेहबुबा यांनी म्हटले आहे की, फयाज यांनी पश्चात्ताप व्यक्त केला असून ते पुन्हा पक्षात परतले आहेत. “जेव्हा कलम ३७० रद्द केले गेले, तेव्हा मी त्यांना राज्यसभेचा राजीनामा द्यायला सांगितले, मात्र त्यांनी दिला नाही आणि मग त्यांना पक्षातून काढण्यात आले. मात्र, आता ते पक्षात परतले आहेत.”

Story img Loader