Richest Loksabha Candidate लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यांचे मतदान पार पडले असून चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा जागेसाठीदेखील या चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जातून उमेदवारांची एकूण संपत्तीही समोर आली आहे. गुंटूर लोकसभा मतदारसंघातील तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) उमेदवार डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी हे या निवडणुकीत आतापर्यंतचे देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे तब्बल ५,७०५ कोटींची संपत्ती आहे.

चंद्रशेखर पेम्मासानी कोण आहेत?

१९९९ मध्ये डॉक्टर एनटीआर हेल्थ सायन्सेस विद्यापीठातून त्यांनी आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २००५ मध्ये त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील गेजिंजर मेडिकल सेंटरमधून एमडी पदवी प्राप्त केली. योगायोगाने २०१९ मध्ये गुंटूरमध्येच टीडीपीचे उमेदवार अमरा राजा ग्रुपचे एमडी गल्ला जयदेव देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार होते. त्यांची एकूण संपत्ती ६८० कोटी होती. परंतु, यंदा निवडणुकीपूर्वीच त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली.

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Property worth 61 crore seized during elections period from backward Vidarbha
मागास विदर्भ निवडणूक काळात संपन्न, ६१ कोटींची मालमत्ता जप्त
property worth rs 494 crore seized in maharashtra
राज्यात आतापर्यंत ४९४ कोटींची संपत्ती जप्त; मुंबई उपनगरात सर्वाधिक मालमत्ता जप्त
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
Chandrapur district Cash, liquor, drugs seized,
चंद्रपूर: रोकड, दारू, ड्रग्ज जप्त
State Bank quarterly profit of Rs 18331 crore
स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई

हेही वाचा : गोध्रा जळितकांड: मोदींची लालूंवर टीका; नेमका कोणत्या समितीचा उल्लेख केला?

पेम्मासानी यांच्या जवळचे मानले जाणारे टीडीपी नेते पट्टभी राम रेड्डी यांनी दावा केला की, तेनालीच्या बुरीपलेम गावचे रहिवासी पेम्मासानी आणि त्यांचे कुटुंब दीर्घकाळापासून पक्षाचे समर्थक आहेत. नरसरोपेट येथे व्यवसाय करणारे त्यांचे वडीलदेखील टीडीपी नेते होते. ते एक अतिशय यशस्वी आणि नामांकित डॉक्टर असल्याचे टीडीपी नेत्यांनी सांगितले. ते म्हणाले, “पेम्मासानी यांनी अमेरिकेत वैद्यकीय प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासक्रम सुरू केला आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी काही ॲप्स आणि सॉफ्टवेअर विकसित करण्यातही मदत केली आहे.”

२५ वर्षांच्या वयात जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात कार्यरत असताना पेम्मासानी यांनी यू वर्ल्ड नावाची एक ऑनलाइन शिक्षण सेवा विकसित केली; ज्याद्वारे विद्यार्थ्यांना सॅट, एमकॅट आणि अमेरिकेच्या वैद्यकीय परवाना परीक्षेसाठी मदत होते. २०२० मध्ये त्यांनी एर्न्स्ट आणि यंग एंटरप्रेन्योर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. पेम्मासानी हे यू वर्ल्डचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी राहिले आहेत. पेम्मासानी यांचे सामाजिक उपक्रमांसाठीदेखील नाव घेतले जाते. टीडीपी नेत्यांच्या म्हणण्यानुसार, २०१४ च्या निवडणुकीदरम्यान त्यांनी पहिल्यांदा राजकीय आणि प्रचाराच्या कामात सक्रिय सहभाग घेतला. २०१९ मध्येही त्यांचा सहभाग होता. ते टीडीपीच्या अनिवासी भारतीय सेलमध्येदेखील सक्रिय आहेत.

“त्यांनी पहिल्यांदाच उघडपणे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचा रेकॉर्ड स्वच्छ आहे आणि त्यांनी कोट्यवधींची संपत्ती जाहीर केली असली तरी त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा हिशेब आहे. गल्ला जयदेव यांनी राजकारणातून निवृत्ती हवी असल्याचे जाहीर केल्यानंतरच डॉ. चंद्रशेखर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली,” असे टीडीपी नेते एन. विजय कुमार म्हणाले.

हेही वाचा : भाजपाला गुजरातमधली लढाई का झाली अवघड?

पेम्मासानी यांच्याकडील संपत्ती

पेम्मासानी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची १०० हून अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे आणि त्यांनी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील आपले उत्पन्न जाहीर केले आहे. जंगम मालमत्तेमध्ये त्यांच्याकडे दोन मर्सिडीज कार, एक टेस्ला आणि एक रोल्स रॉयस कार आहे. त्यांच्याकडे हैदराबाद, तेनाली आणि अमेरिकेमध्ये जमीन आणि मालमत्ता आहे. पेम्मासानी यांच्यावर १.०३८ कोटींचे कर्जही आहे. तसेच निवडणूक आणि लाचखोरीच्या संदर्भात बेकायदेशीर पेमेंटशी संबंधित एक गुन्हाही दाखल आहे. पेम्मासानी यांचे मुख्य प्रतिस्पर्धी वायएसआरसीपीचे किलारी वेंकट रोसैया आहेत. ते पोन्नूरचे विद्यमान आमदार आहेत. २०१९ मध्ये टीडीपीच्या गल्ला जयदेव यांनी वायएसआरसीपीच्या एम. वेणुगोपाल रेड्डी यांचा ४,२०५ मतांच्या फरकाने पराभव केला होता.