चंद्रशेखर बोबडे

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या पतनानंतर काँग्रेसच्या वैदर्भीय नेत्यांमधील अंतर्गत धुसफूस वाढली आहे. विधान परिषद निवडणुकीत पक्षाची मते फुटणे  हे प्रदेशाध्यक्षांचे अपयश मानले जात आहे. मात्र यावर सध्या काँग्रसमध्ये कोणीही काहीही बोलत नाही. दुसरीकडे शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीला गैरहजेरीच्या  मुद्यावरून आमदारांना नोटीस बजावली जात आहे. यावरून प्रदेशाध्यक्षांविरुद्ध पक्षात नाराजीचा सूर आहे.  

हेही वाचा- भाजपच्या पक्षविस्ताराचा हुकमी एक्का, द्रौपदी मुर्मू!

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची एकूण सात मते फुटली होती. त्यापैकी तीन मते ही पूर्व विदर्भातील आहेत अशी खात्रीलायक माहिती आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पूर्व विदर्भातीलच आहेत. त्यांच्याच भागातील पक्षाची मते फुटणे ही गंभीर बाब असताना या प्रकरणाची अपेक्षित अशी गांभीर्याने दखल घेतली गेलेली नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या उलट बहुमत चाचणीला आमदारांची गैरहजेरी हा मुद्दा प्रदेशाध्यक्षांनी प्रतिष्ठेचा केला. यासाठी त्यांनी दिल्ली वारी केली. राज्यातील नेत्यांविरोधात तक्रारी केल्या. त्यामुळे नाराजी आहे.

हेही वाचा- काँग्रेसच्या ताब्यातील जालना नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी रावसाहेब दानवे यांची व्यूहरचना

पक्षाने जे्ष्ठ नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, बहुमत चाचणीपूर्वी एक दिवसांआधी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे सरकारकडे स्पष्ट बहुमत असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशीची बहुमत चाचणी ही फक्त औपचारिकता होती. आमदारांच्या हजेरीचा किंवा गैरहजेरीचा सरकारच्या बहुमतावर कोणताही परिणाम होणार नव्हता. पक्षाच्या विरोधात मतदान करायचे असते तर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीलाच गैरहजर असतो. पण तसे काही केले

Story img Loader