चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी नोएडामध्ये नवीन फिल्म सिटी उभारण्यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. बोनी कपूरच्या बेव्यू प्रोजेक्ट्स आणि रिअल इस्टेट कंपनी भुतानी ग्रुपला नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ यूपी सरकारच्या फिल्म सिटी विकसित करण्याचे अधिकार मिळाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बोनी कपूर यांच्यात आंतरराष्ट्रीय फिल्म सिटी तयार करण्यासाठी कागदपत्रांची देवाणघेवाणही झालीय. त्यामुळे प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

खरं तर योगी आदित्यानाथ यांची १ हजार एकर क्षेत्रात फिल्मसिटी उभारण्याची योजना आहे, त्यापैकी २२० एकर व्यावसायिक वापरासाठी ठेवण्यात येणार आहे. फिल्मसिटी टप्प्याटप्प्याने बांधली जाणार असून, विकासाच्या पहिल्या टप्प्यात ही फिल्म सिटी २३० एकरांमध्ये तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यमुना एक्सप्रेस वे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी (YEIDA) अंतर्गत इंटरनॅशनल फिल्म सिटी प्रकल्पाची बहुप्रतीक्षित सुरुवात येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रयत्नातून नियुक्त केलेल्या भूखंडावर उत्खनन आणि सीमांकन यांसारख्या महत्त्वाच्या हालचालीही लवकरच सुरू होणार आहेत.

हेही वाचाः भाजपकडून लोकसभेसाठी पाच महिलांना उमेदवारी, पूनम महाजन यांच्यावर टांगती तलवार

Innovation City
गिफ्ट सिटीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही होणार ‘Innovation City’, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Proposal to set up a new super specialty hospital in Pune news
पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होणार! लवकरच नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
Ramabai Ambedkar Nagar Redevelopment, Zopu Authority, huts vacant, mumbai,
रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास : झोपु प्राधिकरणाकडून आतापर्यंत २५०० झोपड्या रिकाम्या
planning authorities , Devendra Fadnavis,
नियोजन प्राधिकरणांचे काम कंपनीच्या धर्तीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नगरविकास विभागाला निर्देश
states fund raise loksatta news
कर्ज उभारणीसाठी राज्यांकडून तिमाहीत चढाओढीने बोली शक्य, उसनवारी ४.७३ लाख कोटींवर जाण्याचा, दरही महागण्याचा अंदाज

योगींच्या ड्रीम प्रोजेक्टवरील १० महत्त्वाचे मुद्दे

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला जात असून, भूतानी समूहाबरोबर मिळून बोनी कपूर यांची कंपनी बेव्यू प्रोजेक्ट एलएलपी तो तयार करणार आहे.

बोनी कपूर यांच्या कंपनीकडून ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन यूपी’ उपक्रमांना प्राधान्य दिले जात असून, प्रकल्पात परदेशातील अत्याधुनिक तंत्रज्ञानही समाविष्ट करण्यात आले आहे.

बोनी कपूरची कंपनी या फिल्म सिटी प्रकल्पातून कमाईच्या वाट्यातील १८ टक्के फायदा मिळवणार असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी करणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बोनी कपूर यांची टीम यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत लेटर ऑफ एजन्सी (LOA) सादर करण्यात आले असून, प्रकल्प कशा पद्धतीनं राबवायचा यावर चर्चा करण्यात आली आहे.

चित्रपट निर्मात्यांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि फायद्यापेक्षा जास्त प्रमाणात रोजगार वाढवण्याच्या उद्देशाने कंपनीने जागतिक दर्जाची फिल्म सिटी तयार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला प्राधान्य दिले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकल्पात ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन यूपी’ची झलक दाखवण्याच्या महत्त्वावर जोर दिला आहे.

संशोधन, सर्वेक्षण, उत्खनन आणि वाटप केलेल्या जमिनीच्या सीमांकनांसह दोन महिन्यांत अंमलबजावणी सुरू करण्याच्या योजना सुरू केल्या आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनाशी जुळवून घेऊन चित्रपट निर्मितीमध्ये उत्तर प्रदेशची प्रतिष्ठा उंचावणे हा फिल्मसिटीचा उद्देश आहे.

उत्तर प्रदेशातील या फिल्मसिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार असून, बोनी कपूर यांनी स्वतः या प्रकल्पात रस घेतला आहे. जागतिक सिनेमा तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ते इतर देशांचा दौराही करणार आहेत. तसेच चित्रपट निर्मात्यांना चांगल्या चित्रपटसृष्टीचा अनुभव यावा यासाठी परिसरात भारतीय आणि परदेशी अशा प्रेक्षणीय स्थळांची निर्मितीही केली जाणार आहे.

राजीव अरोरा यांनी फिल्म सिटीला अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्याचा पुनरुच्चार केला आहे. बोनी कपूर यांची आगामी परदेशातील दौरा हे UPEIDA च्या आंतरराष्ट्रीय फिल्म सिटीकडून नवनव्या संकल्पना आत्मसाद करण्याचा प्रयत्न दाखवते.

हेही वाचा: सांगलीत संजयकाका पाटील यांना हॅटट्रिक साधण्याचे मोठे आव्हान

YEIDA मधील आगामी आंतरराष्ट्रीय फिल्म सिटीचे उद्दिष्ट चित्रपट निर्मात्यांना वेगळा अनुभव प्रदान करण्याचा आहे. या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे चित्रपट निर्मात्यांना चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आहे, जेणेकरून त्यांना फिल्म सिटीच्या हद्दीत अनेक भारतीय अन् आंतरराष्ट्रीय ठिकाणं तयार करायची आहेत. काश्मीरची गिरिशिखरं, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत, दिल्लीतल्या ऐतिहासिक वास्तू, केरळातला लोभसवाणा निसर्ग हे सगळं एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी या प्रकल्पामुळे उपलब्ध होणार आहे.

Story img Loader